महावितरण कंपनीमार्फत आकारण्यात येणाऱ्या वाढीव भरमसाठ वीजबिलांबाबत वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी





 

 

 

 

महावितरण कंपनीमार्फत आकारण्यात येणाऱ्या वाढीव भरमसाठ वीजबिलांबाबत वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत असून सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वीज ग्राहकांना होत असलेल्या अकारण त्रासाची दखल घेऊन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ब चे सभापती नगरसेवक श्री. संजय भोपी साहेब यांनी वीजबिले ग्राहकांच्या वापराप्रमाणे व योग्य पद्धतीने आकारण्याबाबत तसेच बिल एकत्रितपणे न घेता टप्याटप्याने सुयोग्य मासिक हप्त्यात बिल भरण्याची मुभा देऊन वीज ग्राहकांना दिलासा देण्यात यावा याबाबतचे लेखी निवेदन मा. कार्यकारी अभियंता, महावितरण - खांदा कॉलनी यांना दिले असून सदर प्रकरणात विशेष लक्ष देण्याबाबत मा. मुख्यमंत्री साहेब, मा. ऊर्जा कॅबिनेट मंत्री, मा. ऊर्जा राज्यमंत्री, मा. जिल्हाधिकारी मॅडम, मा. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना ई - मेल द्वारे निवेदन पाठवून विनंती करण्यात आली आहे.

तरी विज ग्राहकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये. मार्च, एप्रिल व मे असे तीन महिन्यांचे एकत्रित आलेले बिल सप्टेंबर अखेरपर्यंत सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची मुभा देण्यात आली असून लॉकडाऊन कालावधीत गावी असलेल्या ग्राहकांना सरासरीने आकारण्यात आलेल्या बिलात सुधारणा करून सध्याचे मीटर रिडींग घेऊन त्याप्रमाणे बिल दिले जाईल तसेच थकीत बिलापोटी कोणाचेही वीज मीटर काढून वीज कनेक्शन बंद करण्यात येणार नाही याचबरोबर सर्व वीज ग्राहकांना आवश्यक आणि योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन महावितरण विभागातर्फे देण्यात आले आहे. या प्रसंगी श्री. संजय भोपी साहेब यांच्यासमवेत कामगार नेते मोतीराम कोळी, पनवेल शहर भाजप उपाध्यक्ष भिमराव पोवार आणि महावितरण विभागाचे सुर्यातल साहेब, निलेश बुकटे साहेब व म्हात्रे साहेब उपस्थित होते.


 

 



 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर