विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या कार्य तत्परतेने विद्युत पुरवठा झाला सुरळीत
पनवेल : निसर्ग चक्रीवादळाने रायगडवर मोठे संकट कोसळले होते. घरांचे कौल, पत्रे उडून फार मोठे नुकसान ग्रामीण तसेच शहरी भागात झाले. चक्रीवादळामुळे विद्युत पोल, झाडे पडून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ह्या वादळात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते तथा संघर्षयोद्धा ( कोविड योद्धा ) प्रितम दादा म्हात्रे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सातत्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्कात राहून तो वीज पुरवठा सुरळीत करून घेतला.. यासंदर्भातसुद्धा रहिवाशांनासुद्धा वारंवार माहिती देत राहीले. याबद्दल स्थानिक रहिवाशांनी प्रितम म्हात्रे यांचे आभार मानले आहेत.
पनवेल शहरातील घाटे आळी, भगत आळी, यशोपुरम सोसायटी, लाईन आळी येथे विद्युत पोल पडल्यामुळे दिनांक ३ जून रोजी पासून विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे अनेक वीजेच्या लाईन खंडीत झाल्या. मुसळधार पावसामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्किलीचे झाले होते. पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी एमएसईबी (महावितरण) सोबत वारंवार पाठपुरावा ठेवत युद्ध पातळीवर हे काम करून घेत विद्युत पुरवठा सुरू करून घेतला. यामुळे येथील रहिवासीयांनी प्रितम म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment