महापौर सहाय्यता निधीस परेश ठाकूर व अर्चना ठाकूर यांची आर्थिक मदत
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवानिमित्त त्यांचे चिरंजीव सभागृहनेते परेश ठाकूर व अर्चना परेश ठाकूर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत म्हणून पनवेल महापालिकेच्या महापौर निधीत प्रत्येकी एक लाख रुपये अशी एकूण ०२ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. सदरचे धनादेश आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर उपस्थित होते.
Comments
Post a Comment