रायगड जिल्ह्यातचक्रीवादळ ‘निसर्ग’मुळे ५ लाखाहून अधिक घरांचं नुकसान


 

रायगड मत / प्रतिनिधी 

 

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील ५ लाखहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. रस्ता वाहतुक सुरळीत करण्यात यश आले असले तरी ग्रामिण भागातील विद्यूत पुरवठा पुर्ववत करण्यासाठी किमान सात ते आठ दिवस लागतील असा अंदाज रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

 

चक्रीवादळाचा जिल्ह्यातील १२ तालुकांना तडखा बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ५ लाख हून अधिक घरांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. तर ५ हजारहून अधिक हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे खंडीत झालेली रस्ते वाहतूक पुर्ववत करण्यात यश आले आहे. मात्र विद्यूत पुरवठा आणि दुरसंचार यंत्रणा खंडीत आहे. शहरी भागातील वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र ग्रामिण भागातील वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. राज्याच्या उर्जा विभागाकडे त्यासाठी मागणी करण्यात आली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

 

म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव, रोहा, मुरुड, अलिबाग तालुक्यांना वादळाचा मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रायगड मध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसाग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज दिले जावे यासाठी प्रयत्न राहील. शासनाच्या सद्य नियमांच्या पलीकडे जाऊन नागरीकांना मदत केली जावी अशी विनंती त्यांच्याकडे केली. असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर