बदलत्या वातावरणामुळे म्हसळ्यातील आंबा बागायतदार हवालदिल

 


 

 शासनाकडून मदतीची अपेक्षा

 

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

 

दक्षिण रायगड मधे मागील काही दिवसांपासून खराब आणि बदलत्या हवामानामुळे म्हसळा तालुक्यातील आंबा बागायतदार हवालदिल झाले असून तयार झालेला आंबा कसा विक्री करायचा या चिंतेत आहेत.

नुकताच दि,14 व 16 मे 2020 रोजी कोकणात जोरदार वाऱ्यासाहित पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा पीक तयार झालेला असून पाऊसामुळे खराब झाला व जोरदार वाऱ्यामुळे आंबा फळ मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. तसेच गुरांच्या वैरणी सुद्धा भिजल्या आहेत.

सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसमुले लॉकडाऊन सुरू असून अनेक मोठमोठ्या बाजारपेठ बंद आहेत. ग्रामीण भागातील बागायतदार मोठ्या संकटात सापडलेल्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट खूप मोठा असून या परिस्थितीतुन सावरण्यासाठी बागायतदारांना शासनाने आर्थिक मदत दिली पाहिजे अशी मागणी होत आहे.

 

प्रतिक्रिया :-

 

 एकीकडे देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आलेले आहे. त्यातच आता थोड्या दिवसात पावसाळा सुरुवात होईल. सध्या कोकणात आंबा फळ पीक तयार झाला असून त्याची विक्री करण्यासाठी शेतकरी चिंतेत आहे. म्हसळा तालुक्यात मागील काही दिवसांपासुन वातावरण खूप बदल झाला आहे आणि त्यातच काही प्रमाणात पाउस देखील पडला आहे. अगोदरच शेतकरी व बागायतदार वर्ग कोरोना, लॉकडाऊन यांनी त्रस्त झालेला आहे. आणि आता तयार झालेल्या व झाडावर तयार होत असलेल्या आंबा फळपीकाची पाऊस व बदलत्या वातावरणामुळे होत असलेली नासाडी यामुळे आंबा बागायतदार आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे शासनाने स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ पंचनामे करून आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी.

श्री.संदिप चाचले

माजी उपसभापती तथा सदस्य पंचायत समिती म्हसळा

 

एक तर शेतकरी कोरोना मुळे परेशान झाला असून त्यात निसर्गाचे कोप सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ आकाश, अवकाळी पाऊस तर कधी जोराचा वारा तर कधी गारा अशा पद्धतीचा वातावरण आंबा पिकासाठी घातक ठरते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसा ? दिनांक 14 व 16 मे 2020 रोजी पडलेल्या पावसामुळे आंबा पिकाचा मोठा नुकसान झाला आहे. वाढलेल्या उष्णनेते मुळे आंबा फळाला साखा (डाग) आला आहे. तरी शासनाने त्वरित आंबा बागांची पाहणी करून घेण्याचे आदेश द्यावेत व नुकसान भरपाई म्हणून मदत द्यावी.

श्री.अहमद कौचाली (तोराडी - बंडवाडी) 

आंबा बागायतदार शेतकरी

 

 

सोबत आंबा फळपीक संग्रहित फोटो टाकावा

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर