कोरोंना विरूढ लढण्यासाठी प्रशासनाला स्थायी समितीने दिले आर्थिक बळ


 

 

 

 

 

पनवेल : कोरोंना विरूढ लढण्यासाठी आवश्यक असलेली जंतू नाशके, किट आणि इतर साहित्य, खरेदी करण्यासाठी आणि  तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी नेमण्यासाठी लागणार्‍या आर्थिक तरतुदीला मान्यता देऊन प्रशासनाच्या सोबत लोकप्रतिनिधी ही असल्याचे दाखवून दिले असल्याचे  शुक्रवार 8 मे रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेनंतर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले. यासभते पावसाळयापूर्वीच्या नाले सफाईच्या कामांना ही मंजूरी देण्यात आली.   



    पनवेल महापालिकेची स्थायी समितीच्या  सभा क्रमांक 33 आणि 34  शुक्रवारी आदय क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात घेण्यात आल्या. यामध्ये अनुक्रमे 19 आणि 5 विषय अजेंडावर होते. दुपारी 12 वाजता  स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांचे अध्यक्षतेखाली  सभा सुरू झाली.  यामध्ये महापालिकेच्या शिल्लक निधीची गुणवणूक राष्ट्रीयकृत बँकेत करण्यास मंजूरी देण्यात आली. या सभेत कोरोंना प्रतिबंधक उपायांसाठी लागणारे किट, जंतू नाशके , हँड ग्लोज, मास्क  इत्यादि खरेदी करण्यास  झालेल्या खर्चास आणि नवीन खरेदीसाठी लागणार्‍या दराला मान्यता देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात प्रभारी आरोग्या अधिकारी, परिचारिका व कर्मचारी उपलब्ध करून घेण्यास ही मंजूरी दिली.  
     इंडिया बुल्सच्या कोन येथील इमारती विलगीकरण कक्षासाठी महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामधील उदवाहन दुरूस्ती आणि देखरेख करण्यासाठीच्या खर्चास ही सभेत मान्यता देण्यात आली. या सभेत कोरोंना व्हायरस प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी खरेदी करावयाच्या आवश्यक असलेल्या फोमिंगमशीन बाजारात उपलब्ध नसल्याने त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला. या सभेच्या पूर्वी विरोधकांनी काही प्रस्ताव दिले, पण प्रशासनाने स्थायी समितीत अशा पध्दतीने आयत्यावेळी प्रस्ताव देता येत नसल्याने ते स्वीकारले नाहीत.
अमृत कार्यक्रमा अंतर्गत पाणी पुरवठा योजना टप्पा 4 फेज -1करिता उर्ध्व्वाहिनी  व वितरण वाहिनी राष्ट्रीय महामार्ग दोन ठिकाणी छेदून पुश थ्रु पध्दतीने टाकण्यास  सभेत मंजूरी देण्यात आली आहे .त्याप्रमाणेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी नवीन सीमेंट कोंक्रीटीचे रस्ते केले आहेत. त्या ठिकाणी ही पाईप लाईन टाकताना पुश थ्रु पध्दतीचा वापर करावा, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले.    



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर