रसायनीत आठ जणांचा कोरोना  अहवाल पाॅजिटीव्ह, खबरदारी म्हणून दोन दिवस जनता कर्फ्य





 

रसायनी--राकेश खराडे

 

      दोन महिन्यांपर्यंत सुरक्षित असलेल्या रसायनीत अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर वाडी येथील तिघांची कोरोना चाचणी पाॅजिटीव्ह,दुर्गांमाता काॅलनी दोन पाॅजिटीव्ह,तर वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील एकाची चाचणी पाॅजिटीव्ह आली असून त्याचे आई-वडीलही कोरोना तपासणी अहवालात पाॅजिटीव्ह आले आहेत. रसायनीत एकूण आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून परीसरात भितीचे वातावरण आहे.या पाश्र्वभूमीवर शिवनगर वाडी परीसर कोरोना विषाणु बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून शिवनगर वाडी,दुर्गांमाता काॅलनी व दापिवली या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

     संपुर्णं देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे.लाॅकडाऊन कालातीत दोन महिने रसायनीकरांनी काटेकोर पालन केले.परंतु दोन महिन्यांनंतर कोरोनाने रसायनीत शिरकाव करुन रहिवाशांना भयभीत केले आहे.शिवनगरवाडीत राहणारा 38 वर्षींय व्यक्ती घाटकोपरला काही दिवस आपल्या बाईंकवरुन कामाला जात होता.त्याला लक्षणे जाणवल्याने त्याने आपली कोरोना तपासणी केली.त्याच्या अहवाल पाॅजिटीव्ह आल्याने त्याने लोहोप आरोग्य केंद्र गाठून पुढे त्याला उपचारासाठी इंडिया बुलमध्ये दाखल करण्यात आले.त्याची पत्नी व लहान मुलगी यांचीही कोरोना चाचणी अहवाल पाॅजिटीव्ह आल्याने त्यांनाही इंडिया बुलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या लहान मुलाचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे.वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील तरुण चेंबूर येथे नोकरीला जात असल्याने त्याला कोरोनाची बाधा झाल्याने त्याचाही तपासणी अहवाल पाॅजिटीव्ह आला तर त्याचे आई-वडीलही कोरोना पाॅजिटीव्ह आले आहेत.तर त्याचाच मित्र वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नविन वसाहत रिस,दुर्गांमाता काॅलनी परीसरातील एक तरुण हाही चेंबूर नवी मुंबईत कामाला जात असल्याने त्याचा व त्याच्या पत्नीचा कोरोना तपासणी अहवाल पाॅजिटीव्ह आला आहे.मंगलवार दि.26 पर्यंत रसायनीत आठ व्यक्तिंचे कोरोना तपासणी अहवाल पाॅजिटीव्ह आल्याने विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या रुग्णांच्या संपर्कांत आलेल्यांची यादी बनविण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे.याकरीता खबरदारी म्हणून जनतेनेच जनतेसाठी उद्या बुधवार व गुरुवार दि.२७,२८ रोजी जनता कर्फ्यु पालण्यात येणार असून जिवनावश्यक वस्तूंची दुकाने वगलता इतर दुकाने बंद राहणार आहेत.रसायनीकरांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची काळजी घेवून सोशल डिस्टिंक्शनचे नियम तंतोतंत पाळावे असे आवाहन होत आहे.


 

 



 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर