खांदा वसाहतीत स्वच्छता दुतांवर पुष्पवर्षाव,आठ दिवसांचा ,कोरडा शिधा देऊन व्यक्त केली कृतज्ञता,नगरसेविका सिताताई पाटील आणि सुनील खाडे यांचा पुढाकार


 




पनवेल/ प्रतिनिधी: कोरोना या वैश्विक संकटात आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या पनवेल महापालिकेच्या स्वच्छता दुतांवर गुरुवारी खांदा वसाहतीत पुष्पवर्षाव करण्यात आला. इतकेच नाही. तर या कामगारांना आठ दिवस पुरेल इतके धान्य देऊन एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यासाठी ज्येष्ठ नगरसेविका सिताताई सदानंद पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील खाडे यांच्यासह इतरांनी पुढाकार घेतला. या उपक्रमाने आरोग्य दूत अक्षरशः भारावून गेले.


 पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या महामारी रोगामुळे एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. काही व्यक्तींचा मृत्यूही या आजाराने झालेला आहे.  कोरोना विषाणूंचे संक्रमण होणे म्हणून लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडत नाहीत. या संकटातही पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. मनपा क्षेत्रातील रस्ते, पदपथ स्वच्छ करणे, झाडू मारणे, झाडाचा पालापाचोळा जमा करणे, डोअर टू डोअर जाऊन कचरा संकलित करणे, परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे, पावडर मारणे यासारखी अनेक कामे संबंधित स्वच्छता दूत करीत आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कमालीची स्वच्छता दिसून येते. अशाप्रकारे वैश्विक संकटात तसेच साथीच्या रोगाचा संसर्ग होत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे आरोग्य अबाधित राखणाऱ्या या स्वच्छता दुतांचे काम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामाबद्दल खांदा वसाहतीत नगरसेविका सिताताई सदानंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील खाडे यांच्यासह इतरांनी कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. वसाहतीतील पाण्याच्या टाकीचा येथे गुरुवारी स्वच्छता कर्मचाऱ्यांना आदरपूर्वक निमंत्रित करण्यात आले. सामाजिक अंतराने या सर्वांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना जीवनावश्यक कोरडा शिधा वाटप करण्यात आला. त्यासाठी पाटील व खाडे यांच्यासह शशिकांत खाडे ,ज्ञानेश्वर देशमुख व शशिकांत योगे यांनी योगदान दिले. यावेळी उपसचिव रविंद्र गुरव , कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, सदानंद पाटील, भाजपच्या महिला कार्यकर्त्या अनिता रासकर चेतन जाधव, मिथुन दर्गे, तन्मय सावंत उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर