विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा देण्याचे काम संघटीतपणे आपण करीत राहू -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल(प्रतिनिधी) कोरोना विषाणू प्रादुर्भाव संकटामुळे शिक्षण क्षेत्रातही मोठे संकट आले आहे. पण या संकटाला न घाबरता विद्यार्थ्यांना दर्जेदा
नॅक मान्यता प्रक्रिया संदर्भात तयारी करीत असलेल्या सर्व शासकीय, अशासकीय अनुदानीत, विनाअनुदानीत महाविद्यालयातील प्राचार्यासाठी तसेच आयक्यूएसी समन्वयक यांची चांगू काना ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालय, रुसा महाराष्ट्र, उच्च शिक्षण कोकण विभाग विभागीय सहसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उच्च शिक्षण कोकण विभाग विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप, रुसाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख सल्लागार डॉ. विजय जोशी, वरिष्ठ सल्लागार डॉ. पी. एन. पाब्रेकर, रुसाचे सहसंचालक प्रमोद पाटील, आयक्यूएसी क्लस्टर इंडियाचे भालचंद्र भोळे, एसआरटीएम विद्यापीठाच्या प्रोफेसर डॉ. वाणी लातूरकर,आदी शिक्षण तज्ञ् तसेच रायगड जिल्हयातील जवळपास ७० महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षण तज्ज्ञांनी नॅक संदर्भात महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेची सुरुवात राष्ट्रगीताने झाल्यानंतर चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत ब-हाटे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर सीकेटी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ज्ञानदानाचे आणि त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सर्व शिक्षण तज्ञ् आणि प्राचार्यांशी संवाद साधताना सांगितले कि, सध्याच्या परिस्थितीत कोरोना संकटामुळे शिक्षण देणारा आणि घेणारा या दोघांची खूप मोठी अडचण झाली आहे. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रातही पुढे आर्थिक अडचणी येतील पण एकत्रितपणे तळमळीने काम केले तर हे संकट दूर करण्यास मदत होईल. मात्र परिस्थिती कशीही असो शिक्षणाकडे कदापिही दुर्लक्ष होता कामा नाही हि आपली तळमळ आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे विद्यार्थी, पालक, शिक्षक, हितचिंतकांचे सहकार्य महत्वाची ठरत असून सर्वांची एकत्रित मेहनत महत्वाची आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी नमूद केले. पुढे बोलताना त्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल येथील चांगू काना ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालयास देशात ६९ वे तर राज्यात २१ वा क्रमांक मिळविला असल्याचे सांगतानाच कार्यशाळेत सहभागी झालेल्यांनी अभिनंदन केले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले कि, सीकेटी महाविद्यायाने पहिल्या वेळेस २००८ आणि दुसऱ्या वेळी २०११ ला ए (A) तर तिसऱ्यावेळी २०१७ साली ए प्लस (A+)' दर्जा मिळविला आहे. सीकेटी महाविद्यालयाने प्रगती केली त्यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ञ यांचे सहकार्य मोलाचे असल्याचे सांगत त्याप्रती आभारही व्यक्त केले. नॅक मूल्यांकनासंदर्भात बोलताना त्यांनी, उच्च व दर्जेदार शिक्षणाच्या दृष्टिकोनातून नॅक अत्यंत महत्वाचे असल्याचा आवर्जून उल्लेख करून नॅकला प्रथम सामोरे जाणारे आणि अपग्रेडेशन ला सामोरे जाणाऱ्या महाविद्यालयांनी सर्व नियमावलीच्या अनुषंगाने तयारी करून नॅक मानांकनात चांगले यश मिळवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी सर्व महाविद्यालयांना दिल्या.
या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे सूत्रसंचालन सीकेटी महाविद्यालयाचे नॅक व रुसाचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक शैलेश वाजेकर यांनी केले. महात्मा फुले पनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर आणि जेएसएम अलिबाग महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. बी. डी. आघाव यांनी या कार्यशाळेचा सारांश मांडला तर आभार प्रदर्शन सीकेटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment