थोडे धीर धरा, संयम पाळा st प्रवास सुरु करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत - आमदार अनिकेत तटकरे यांनी दिला सल्ला
म्हसळा (जितेंद्र नटे)
10 x 10 च्या खोलीत कोरोनाच्या भीतीने जगावे कि, ST ने गावी जावे चाकरमाण्याचा एकच प्रश्न
"आमदार साहेब, राशन पाणी संपलं, आम्ही 2 महिने संयमच पळतोय अजून किती पाळायचा" - मुंबईकर चाकरमानी लोकांनी नालासोपारा st डेपो आणि परळ st डेपोत केली तुफान गर्दी
"मुंबईकर Lockdown मुळे अडकले आहेत त्यांची काळजी आम्हाला आहेच, पण गावी सुद्धा लोक सुरक्षित राहणे तितकेच महत्वाचे आहे." - अनिकेत तटकरे
"गावचे लोक विरोध करीत आहेत, एकूण 3 लाख लोक कोकणात जाणारी आहेत. त्यामुळे त्यांना ठेवणार कुठे? 17 तारखे पर्यंत st सोडणार नाही" - परिवहन मंत्री (ढिसाळ मंत्री) अनिल परब बडबडले
"मुंबईकर गावी जाण्यासाठी याचना करीत आहेत. मात्र गावची लोक विरोध करीत आहेत, असे म्हटले जाते. हे मात्र गाववाले चुकीचे करीत आहेत. हमेशा गाववाल्यांसाठी धावून जाणारे मुंबईकर आज संकटात आहे. तर गाववाल्यानी विरोध करण्यापेक्षा आपल्या मुंबईकराना अलगीकरण करुंन 14 दिवस सांभाळू शकत नाहीत का? हीच का ती माणुसकी." - वैतागलेला एक निराश चाकरमानी
परराज्यातील, पर देशातील लोकांना सरकार आणू शकतो. त्यांचा खर्च उचलू शकतो, त्यांना खाणे पिणे देऊन अलगीकरन करून सुरक्षित ठेवू शकतो तर स्थानिक लोकांनी काय घोडे मारले आहेत? त्यांच्यासाठी टाळाटाळ का हा एकच प्रश्न मुंबईकर आपणांस या "रायगड मत'च्या विशेष बातमीद्वारे प्रशासनास विचारत आहे?
म्हसळा (जितेंद्र नटे)
raigadmat.page
'रायगड मत'ने कोकण चाकरमान्यासाठी जो बुलंद आवाज उठवला त्याला प्रतिसाद देत हजारो मुंबईकरांचे फोन कॉल आले तसेच व्हाट्सअप सुद्धा आले. अनेकांनी आपली चीड तर काहींनी आपली व्यथा मांडली. 'रायगड मत' च्या अनेक बातम्यामधून जनतेच्या मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. प्रशासन प्रयत्न करतोय पण सरकारचे आदेश आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये संभ्रम दिसून येत आहे असे आमदार अनिकेत तटकरे म्हणाले. मात्र लवकरच यावर मात करून आपण सर्वजण यातून नक्कीच मार्ग काढू असा धीर ही त्यांनी दिला. तटकरे साहेब, पालकमंत्री आदिती तटकरे खूप प्रयत्नशील आहेत आणि तटकरे साहेब प्रयत्नशील आहेत यावर लोकांचा विश्वास आहे. अनेक दिवसापासून तटकरे फौंडेशनच्या माध्यमातून धान्य वाटप होत आहे. तसेच अनेकांना मदत ते करीत आहेत. ज्या महिलेचा माणगाव येथे मृत्यू झाला त्यांना आता मदत मिळावी म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र ही लिहिले आहे. त्यांना मदत मिळवून देण्याची पहिली बातमी 'रायगड मत'नेच दिली होती. त्यामुळे तटकरे साहेबच आम्हाला गावी आणण्यासाठी प्रयत्न करतील यावर विश्वासाचा नव्हे तर खात्री आहे. तटकरे हेच आमचे मायबाप आहेत. अशा भावना काही मुंबईकरानी 'रायगड मत' चे संपादक जितेंद्र नटे यांच्याकडे व्यक्त केल्या.
अडकलेले चाकरमानी हे आपलेच आहेत त्यांना गावी आणणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र काही अडचणी आहेत. जे प्रवासी मुंबईहून येणार त्यांना क्वारनटाइन करणे ही तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी उपाय योजना काय करता येतील? 14 दिवस मुंबई हुन आलेल्या लोकांना कुठे ठेवायचे याचे नियोजनासाठी आम्ही स्थानिक पोलीस, तहसील, ग्रामपंचायत पातळीवर चर्चा करून लवकरच ती व्यवस्था करणार आहोत. मुंबईकर जसे Lockdown मुळे अडकले आहेत त्यांची काळजी आम्हाला पण आहेच. पण गावी सुद्धा लोक सुरक्षित राहणे तितकेच महत्वाचे आहे. कालच मंडणगड येथे आलेले काही मुंबईकर 11 जण Possitive निघाले आहेत. सरकार ताबडतोब परवानगी देत नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी विरोध ही पाहायला मिळत आहे. यातुन आम्ही समन्वय मार्ग काढत आहोत. अडचणी खूप आहेत मात्र आपण सगळे मिळून यावर मात करू आणि आपणास नक्की गावी सुरक्षित आणू असे वचनबद्ध संदेश आमदार अनिकेत तटकरे यांनी आपल्या ऑडिओ क्लिप द्वारे संबोधित केले आहे.
याचा अर्थ आमदार अनिकेत तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे साहेब हे चाकरमान्यासाठी प्रयत्न शील आहेत, तरी आपण सर्व कागदपत्र तयार ठेवावेत ज्यांना कुणाला जायचे आहे त्यांनी st च्या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करा. आपली बुकिंग करून st द्वारे सुरक्षित चेकअप करूनच गावी आणले जाईल. मात्र सध्या कुणीही जीव धोक्यात टाकून येऊ नये. अशी विनंती ही त्यांनी या आपल्या ऑडिओ क्लिप मधे केली आहे. शासन लवकरच योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र 'रायगड मत'च्या या विशेष बातमी द्वारे आमदार अनिकेत तटकरे आणि प्रशासन यांना सूचना करू इच्छितो कि, जर St बुक करण्यासाठी विलंब लागत असेल. आपल्या कडे प्राव्हेट बस हा एक ऑपशन आहे. काही विशिष्ट्य गाड्या ज्या तालुक्यातून रोज ये जा करत होत्या. त्यांना विशेष परवानगी दिली तर सुरक्षित काळजी घेऊन अडकलेल्या चाकरमानी वर्गाला आपण लवकरात लवकर मुबंईहुन गावी आणू शकू. शासनाच्या नियमानुसार ज्या काही सूचना असतील त्यांचे पालन करून मुंबईकर आपल्या गावी जाण्यासाठी आतुर झाला आहे कारण इथे अडचणी ही खूप आहेत. एकतर कंपन्या सुरु होणार नाहीत मग घरी बसून पोट कसे भरायचे? मुंबईत बसून राहणे परवडत नाही, तसेच काही लोक चाळीमध्ये राहतात तेथे सार्वजनिक टॉयलेट असतात. अशा ठिकाणी कोरोना नक्कीच वाढेल. ही भीती लोकामध्ये आहे. तसेच काही लोकांच्या रूम लहान आहेत. त्यामध्ये संसर्ग होण्याचा धोकाही आहे. या सर्व कारणामुळे मुंबईकर गावी जाण्यासाठी याचना करीत आहेत. मात्र गावची लोक विरोध करीत आहेत असे म्हटले जाते. हे मात्र चुकीचे आहे. गाववाल्यांसाठी हा मुंबईकर नेहमीच धावून गेलेला आहे आणि आज मुंबईकर संकटात आहे. तर गाववाल्यानी विरोध करण्यापेक्षा आपल्या मुंबईकराना अलगीकरण करुंन 14 दिवस सांभाळू शकत नाहीत का? हीच का ती माणुसकी. याच गावासाठी चाकरमानी मुंबईहून धावत जातं असतो आणि आता त्यांना तुम्ही येऊ नका इकडे पण रोग वाढेल असे कळविण्यात येते. म्हणजे तुमचा जीव तो जीव आणि मुबंई वाल्यांचा जीव नाही का? ज्या कुणी व्यक्तीने आपणांस सांगितले कि मुंबई कराना आणू नका बहुतेक त्या व्यक्तीचे नातेवाईक मुंबईत नसावेत. म्हणूनच तो असा बोलत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा व्यक्तीचा सल्ला आपण घेताच कशाला? आपल्या लोकांना सुरक्षित आणण्या ऐवजी, त्यावर उपाय योजना करण्याऐवजी जर प्रशासन हात झटकत असेल तर याच्यासारखें दुर्दैव नाही. परराज्यातील, पर देशातील लोकांना सरकार आणू शकतो. त्यांचा खर्च उचलू शकतो, त्यांना खाणे पिणे देऊन अलगीकरन करून सुरक्षित ठेवू शकतो तर स्थानिक लोकांनी काय घोडे मारले आहेत? त्यांच्यासाठी टाळाटाळ का? हा एकच प्रश्न मुंबईकर आपणांस या "रायगड मत'च्या बातमीद्वारे प्रशासनास विचारत आहे? गेली 2 महिने लोक अडकून पडली आहेत. ना पैसा आहे? ना राशन? मग जगायचे कसे? जर गावी आणण्यासाठी प्रशासन विरोध करीत असेल तर मग प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीला 10 हजार रुपये द्या. म्हणजे मुंबईकर त्यांचा राशन पाणी तरी भरतील येथे. धड जगता ही येत नाही आणि सांगता ही येत नाही अशी अवस्था सध्या मुंबईकरांची झाली आहे. गेली 2 महिने झाले मुंबई करानी संयम पाळला आहे मात्र आता हा संयम सुटत चालला आहे. जर गाड्यांची व्यवस्था होणार नसेल तर 3 लाख मुंबईकर चाकरमानी काही दिवसात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. काही लोक चालत गावी निघाले आहेत. मग मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने चाकरमानी मुंबईकरांसाठी योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा 'रायगड मत'च्या या विशेष बातमीद्वारे मांडत आहोत. आणि गरिबांचे कैवारी, कोकणचे भाग्यविधाते खासदार सुनील तटकरे साहेब या विषयाची ताबडतोब दखल घेतील अशी आशा अपेक्षा संपूर्ण चाकरमानी वर्गाकडून करीत आहोत.
पत्रकार जितेंद्र नटे
(संपादक - रायगड मत)
Mo. 8652654519 / 9137595224
मुक्काम - सकलप कोंड, पोस्ट तालुका - म्हसळा,
जिल्हा - रायगड. पिन - 402105.
Comments
Post a Comment