एपीएम टर्मिनल्सतर्फे कोव्हिड १९ विरोधात लढण्यासाठी समाजाला मदत विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मास्क आणि साबणांचे वितरण
उरण (प्रतिनिधी) कोव्हिड १९ साथीदरम्यान एपीएम टर्मिनल्स मुंबई या गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) नावानेही ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने टर्मिनल परिसरातील समाजापर्यंत पोहोचत मास्क आणि साबणांचे वितरण केले. सध्याच्या परिस्थितीत अतिशय गरजेची असलेली स्वच्छतेची सवय स्थानिक समाजामध्ये रुजवण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे.
एपीएम टर्मिनल्स मुंबईतर्फे येथील समाजात ४५ हजार मास्क आणि तितक्याच साबणांचे वितरण करण्यात आले. गावांच्या सरपंचांकडे मास्क व साबण सोपवण्यात आले असून ते पुढे रहिवाशांना वितरण करणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गावकऱ्यांना सभोवताली स्वच्छता राखण्याचे महत्त्व समजावून देण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन ऑपरेशन्स प्रमुख अलोक मिश्रा आणि एचआर प्रमुख ईआर ऍडमिन सुनील सुजी यांनी केले.
एपीएम टर्मिनल्स मुंबई नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, जसखार, सोनारी, करळ, सावरखार, बेलपाडा, फुंडे, बोकाडविरा, डोंगरी, पाणजे, धुतम, पागोटे, घारापुरी इत्यादी या गावांमध्ये सक्रिय असून तिथे बरेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम सुरू केलेले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतेक जण पोर्टजवळील गावांतील असून त्यांच्या कल्याणासाठी झटण्यास एपीएम टर्मिनल्स सतत प्रयत्न करत असते.टर्मिनलने प्री- गेट पार्किंगला भेट देणारेबाहेरचे ट्रकचालक तसेच क्लीनर्सनाही मास्क व साबणाचे वितरण केले आहे.
एपीएम टर्मिनल्स, मुंबईचे प्रमुख ऑपरेटिंग अधिकारी गिरीश अगरवाल म्हणाले, ‘आमच्या टर्मिनलभोवतीच्या परिसरात या साथीशी लढण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत. या अवघड काळात आम्ही सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे असून स्थानिक समाजाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी तयार आहोत.’ असेही त्यांनी नमूद केले आहे.
Comments
Post a Comment