म्हसळा घोणसे घाटात इंधन वाहतूक करणार्‍या टँकरचा अपघात

 



 

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर 

 

  मुंबई शिवडीहुन माणगाव म्हसळा मार्गे श्रीवर्धन येथे पेट्रोल, डिझेल इंधनाची वाहतूक करीत असलेल्या टँकरचा म्हसळा तालुक्यातील अपघाताचा कर्दनकाळ ठरलेल्या घोणसे घाटात केळेवाडी येथील तीव्र उतारवळणावर रविवारी सकाळी अपघात झाला आहे. टँकर चालकाचा इंधनाने भरलेल्या गाडीचा झोका गेल्याने टँकर तीव्र उताराचे वळणावर जागीच पलटी झाला. अपघातात टँकरचा चालक किरलोक जखमी झाला असून ज्या ठिकाणी अपघात झाला आहे तो वळण खुपच धोकादायक असून त्याच ठिकाणी अनेक वाहनांचे अपघात होतात. असे असले तरी ह्या तीव्र उताराचे रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे बांधकाम गेली दोन वर्षे रखडले आहे. अपघाती भारत पेट्रोलियमच्या टँकरमध्ये ८ हजार लीटर पेट्रोल व ४ हजार लीटर डिझेल असल्याचे सांगण्यात आले सदर इंधन श्रीवर्धन येथिल लांबे ऑटोमोबाइल येथे नेण्यात येणार होते. टँकर म्हसळा घोणसे घाटात उतरत असताना चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने या टँकरचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर घाट परिसरातील नागरिकानी जीव धोक्यात टाकुन पेट्रोल, डिझेल गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. टँकरला अपघात झाल्याने किमान 3 हजार लीटर पेट्रोल व डिझेल वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच तहसिलदार शरद गोसावी,सर्कल दत्ता कर्चे,पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे,पोलिस निरीक्षक दिपक धूस,हवालदार भोईर,पोलिस कारकिले हे घटना स्थळी पोहचले आणि क्रेन च्या सहाय्याने अपघाती टँकर रस्त्यावरून बाजूला केले.

 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर