ठाकूर कुटुंबियांकडून मदतीचा ओघ सुरूच

 


 

 

 

 

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधील गोरगरीब कुटुंबाना श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि माजी खासदार दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या विद्यमाने हजारो कुटुंबाना जीवनावश्यक अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. 


          कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो ठाकूर कुटुंबिय समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीला धावून येत असतात हे फक्त पनवेल, रायगड नाही तर राज्याने पाहिले आहे. त्यामुळे  ठाकूर कुटुंबीय सर्व समाजाचा आधार म्हणून परिचित आहे.  सहकार्याने भाजपा पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, युवा नेते विनोद घरत, वासुदेव घरत, निर्दोष केणी, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान गायकर, जगदीश घरत, जयवंत घरत, प्रभाकर जोशी, अल्पसंख्यांक समाजाचे नेते मन्सूर पटेल, साजिद पटेल, सचिन वास्कर, जयदास तेलवणे, अब्दुल्ला पटेल, संतोष रेवने, रामचंद्र जाधव, कृष्णा केसरकर, प्रमोद म्हात्रे यांच्या प्रयत्नाने पापडीचा पाडा येथे २०० कुटुंबाला, फरशीपाडा येथे १००, कुटुंबाला ओवे पेठ १५०, खुटुक बांधण गाव व आदिवासी वाड़ी येथे १५०, धामोळे येथे १००, ओवे कॅम्प १५०, ओवे १३० अशा जवळपास १ हजार कुटुंबाला अन्न धान्य देण्यात आले. 

        कोरोनाच्या धर्तीवर लॉक डाउनच्या परिस्थितीत हजारो जणांना एका वेळेच्या जेवणासाठी धडपडणाऱ्या जीवांना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांनी 'मोदी भोजन' कम्युनिटी किचनच्या माध्यमातून आधार दिला. आज लॉक डाउन झाल्या पासून जवळ जवळ तीस हजार कुटुंबाला रेशन व २३ एप्रिलपासून ते आज पर्यत दरदिवशी पनवेलमध्ये ६५०, कामोठेत ६००, कळंबोली ६००, खारघरमध्ये ८५० गरीब गरजू मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना असे एकूण आजपर्यंत ५० हजार पेक्षा जास्त लोकांना एक वेळचे जेवण श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, नगरसेवक, कार्यकर्ते, व नागरिकांच्या सहकार्याने देण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ठाकूर कुटुंबिय सर्वसामान्य जनतेची सेवा अखंडपणे करीत आहेत, असे मत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी व्यक्त केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर