दिलीप चक्रवर्ती म्हणजे माणुसकीचा झरा - अनिल राय पनवेलच्या पत्रकारांना अन्नधान्य वाटून केली मदत
जितेंद्र नटे / पनवेल
17 मे ही तारीख पत्रकारांसाठी फार महत्वाचा आहे. वृत्तपत्राचे जन्मदाते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज पुण्यतिथी होय. याच दिवशी मोठ्या मनाचा माणुसकी जपणारे आदरणीय दिलीप चक्रवर्ती यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. आजच्या दिवशीच त्यांनी पनवेलच्या पत्रकारांना अन्नधान्य वाटून मदत केली. पत्रकार हा देशाचा चवथा आधारस्तंभ आहे. कोरोनासारख्या संकटात पत्रकार ही आर्थिक संकटात आहेत. म्हणूनच पनवेल प्रेस क्लब चे उपाध्यक्ष आणि 'स्टार पनवेल'चे स्टार संपादक यांनी दिलीप चक्रवर्ती यांच्याकडे शब्द टाकला आणि शब्दाला जागत त्यांनी पत्रकारांना मदत ही केली. सरकार, पोलीस, डॉक्टर्स, नर्स सगळेच काम करीत आहेत. मात्र त्यांना पगार मिळतो. या कोरोना महामारीच्या जन जागृती मध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे, मात्र तो नेहमीच उपेक्षित राहिला आहे. पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विजय कडू व अध्यक्ष श्री. सय्यद अकबर यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्न धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये 5 किलो तांदूळ, तेल, मीठ, चहापत्ती, कांदे-बटाटी, साखर, डाळ तसेच अन्य वस्तूचा समावेश होता.
दिलीप चक्र वर्ती आणि अनिल राय यांनी केलेले हे सामाजिक काम म्हणजे पुण्याचे काम असून पत्रकारांची दखल घेतल्या मुळे 'प्रेसक्लब'च्या वतीने जाहीर आभार मानून लाख लाख धन्यवाद देण्यात आले आले.
सर्व पत्रकारांना मोफत धान्य वाटप केल्यामुळे आपली ही कोणी काळजी करतात या भावनेनेच पत्रकार मंडळींना खूप बरे वाटले. यामुळे काम करण्याची नवीन जिद्द, उमेद मिळाली असल्याची भावना पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय कडू तथा अध्यक्ष श्री. सय्यद अकबर यांनी आभार मानून आपले 'मत' रायगड मत कडे व्यक्त केले.
या पत्रकार मित्रांना मोफत औषधं मिळण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढण्यासाठी 'स्टार पनवेल' या वर्तमान पत्राचे संपादक तथा 'पनवेल प्रेस' क्लबचे उपाध्यक्ष समाजसेवक श्री. अनिल राय यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्यामुळेच ही मदत सर्व पत्रकार बंधूना मिळाली म्हणून सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी 'दै. वादळवारा'चे संपादक तथा 'पनवेल प्रेस क्लब'चे संस्थापक श्री. विजय कडू (अप्पा), अध्यक्ष तथा 'कोकण डायरी'चे संपादक श्री. सय्यद अकबर, 'रायगड मत'चे संपादक तथा 'पनवेल प्रेस क्लब'चे उपाध्यक्ष श्री. जितेंद्र नटे, 'स्टार पनवेल'चे संपादक व उपाध्यक्ष अनिलजी राय, 'अभेद्य प्रहार'चे संपादक प्रकाश म्हात्रे व 'मतभेद'चे संपादक प्रमोद जाधव, 'रायगड टूडे'चे संपादक क्षितिज कडू, 'दै. पुढारी'चे पत्रकार श्री. राज भंडारी, 'तरुण भारत'चे पत्रकार संतोष वाव्हळ, 'क्षितिज पर्व'चे श्री. सनिप कलोते, जेष्ठ पत्रकार भारतकुमार कांबळे, 'आदिवासी सम्राट'चे गणपत वारगाडा, असीम शेख, फजले आलम, सचिन वायदंडे, दैनिक शिवतेज पत्रकार विकास पाटील, माजी अध्यक्ष श्री. आनंद पवार, AM News चॅनलचे साहिल रेलेकर, शेख इम्रान, नावडेकर व पनवेल प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते. हा कार्यक्रम करीत असताना सर्वांनी फिजिकल डिस्टन्स या नियमांचा तंतोतंत पालन केले.
raigadmat.page
संपादक - जितेंद्र नटे
रायगड मत वर्तमान पत्र
Mo. 8652654519/9137595224
Comments
Post a Comment