सामाजिक बांधिलकी जपत "मदत नव्हे आपले कर्तव्य" समजून केली समाजसेवा - मोहम्मद उमर(सादिक) खान व विजय पाल


 

 

 आमचा देश "सर्व धर्म समभाव" असल्याचे दिला संदेश. 

मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या परप्रांतीयांनसाठी जेवणाची व पाण्याची व्यवस्था केली गेली. त्यावेळी हिंदी भाषिक परप्रांतीयांनी "आप हमारे लिये भगवान के दूत बनकर आये हो"असा आशिर्वाद देत व्यक्त केले आभार. 

 

पनवेल / सय्यद अकबर 

 

        कोरोना विषाणूच्या साथीने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली गेली व लॉकडाउन टप्या टप्याने म्हणजे चार टप्यात घोषित केला गेला. अशा वेळी अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ असणारे उद्योग धंदे सोडून बाकी सर्व छोटे मोठे उद्योगधंदे बंद करण्यात आले. त्या मध्ये रिक्षावाले,छत्रीवाले, बूटपॉलिशवाले, केस कर्तनालाय,खाजगी व शासकीय ठेकेदारांनकडे काम करणारे मजूर, बिगारी कामगार, वेटबिगारी, झोपडपट्टीतील रोजंदारीवर व भंगार गोळा करणारे कामगार, भिकारी तसेच रोज कमवून खाणाऱ्या गोरगरीब गरजू लोकांचे पैसे व अन्नधान्य़ा अभावी अतोनात हाल झाले. अशा वेळी बऱ्याच समाजसेवी संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत "मदत नव्हे आपले कर्तव्य" समजून पुढे आले. आणि या सर्व संस्थेत गेली अनेक वर्षे लोकांच्या सुखा दुःखात राहून काम करणारी संस्था आणि ती म्हणजे कामोठे येथील सुन्नी गौसिया चिस्तिया चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी मोहम्मद उमर (सादिक) खान व शामदेवी माता ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाल या दोन्ही ट्रस्टने मिळून लॉकडाउन चालू झाल्या पासून म्हणजेच ६७ दिवस अविरीत सेवा करीत वरील सर्व गरजू लोकांसाठी मास्क, सँनिटायझर,हातमोझे, शिजलेले अन्न,तांदूळ,गव्हाचे पीठ, तूरडाळ, गोडेतेल, साखर,चहापत्ती,मीठ,मिरची पावडर, कांदा बटाटा अश्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले गेले.वरील सर्व मजूरलोक कामोठे गावातील बैठी चाळ,झुई गावातील बैठी चाळ,कळंबोली,खांदेश्वर येथील झोपडपट्टी, बैठीचाळ, छोटया छोटया इमारतीत राहणाऱ्या लोकांनी सुन्नी गौसिया चिस्तिया चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी व त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच शामदेवी माता ट्रस्टचे अध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले. तसेच या दोन्ही ट्रस्टच्या वतीने मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या परप्रांतीयांन साठी जेवणाची व पाण्याची व्यवस्था केली गेली त्यावेळी हिंदी भाषिक परप्रांतीयांनी "आप हमारे लिये भगवान के दूत बनकर आये हो"असा आशिर्वाद देत आभार व्यक्त केले.तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाच्या महामारी मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबापासून लांब राहून जनतेची अहो रात्र सेवा करतात अशा वेळी दोन्ही ट्रस्टच्या वतीने पवित्र रमजान ईदच्या दिवशी कामोठे पोलीस ठाण्यातील ६० पोलीस कर्मचारी, कळंबोली आर.टी. ओतील ३० कर्मचारी व खांदेश्वर पोलीस ठाण्यातील २० पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गोड शिरकुरम्याचे तसेच शाकाहारी व मासांहारी जेवणाचे आयोजन करून ईद मोठ्या उत्साहात साजरी करीत "सर्व धर्म समभाव" असल्याचे दाखवून दिले. या संपूर्ण सेवेत अग्रभागी राहून सेवा करणारी सुन्नी गौसिया चिस्तिया चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी मोहम्मद उमर(सादिक)खान, इम्रान शेख, नायब शेख, रमिज खान, सलमान खान, रशीद शेख, अकिलभाई व शामदेवी माता ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाल, सिद्दु आदी पदाधिकारी सदस्यांनी घेतले अथक परिश्रम. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर