संचारबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उद्योजक शिक्षणप्रेमींनी उचलण्याचे निवृत्त आदर्श शिक्षक दा.चा.कडू गुरुजींचे आवाहन 

 


 

पनवेल : राज भंडारी 

 

संचारबंदीमुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती ढासळलीआहे. त्यातच नागरिकांच्या मुलांनाही आता शैक्षणिक समस्यांचा वेढा पडण्यास सुरुवात झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे रांजणपाडा येथील दा.चा.कडू गुरुजींनी लक्ष वेधले असून त्यांनी परिसरातील लहानमोठे उद्योजक, शिक्षणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांना अशा अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलण्याचे आवाहन केले आहे.


 

संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार मजला आहे, देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून देशातील संचारबंदीने चौथा टप्पा गाठला आहे. यातच गेले अडीच महिने हाताशी काम नसल्यामुळे हाताशी असणारा पैसा संपला आहे. त्यामुळे आता जून महिन्यात सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षात या पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणाच्या काळजीने सतावून सोडले आहे. मात्र रांजणपाडा येथील निवृत्त आदर्श शिक्षक दा.चा.कडू यांनी मात्र परिसरातील दानशूर अशा लहानमोठ्या उद्योजकांसह शिक्षणप्रेमी आणि सामाजिक, स्वयंसेवी संस्थांना अशा विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आज संचारबंदीमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत, हाताशी असणार सगळं संपलं आहे, मात्र मानवी जीवनात कोणाला निराश होऊ देऊ नका आणि आपल्या परिसरातील तसेच इतर परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात अडचण निर्माण न होण्यासाठी परिसरातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असून अशा अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी लहानमोठे उद्योजक, शिक्षणप्रेमी आणि स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मदत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आणि अशा दानशूर व्यक्तींना कडू गुरुजींनी आवाहन केले आहे.



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर