अखेर.., म्हसळ्यातील 'त्या' शिक्षकाला केले निलंबित....कोरोनाचे पार्श्वभूमीवर लॉकडाऊन, संचार बंदी काळात बेकायदेशीररित्या व धोकादायक प्रवास करणे प्रकरण भोवले...


 


 


 


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर


कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशासह महाराष्ट्र अडचणीत सापडला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केला असून संचार बंदी लागू केली आहे. कोरोना ची साखळी तोडण्यासाठी व खबरदारी म्हणून गावागावात कोरोना संसर्ग नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहेत. या पथकाद्वारे कोरोनाचे बाबत माहिती देण्यासाठी ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका असे सरकारी व निमसरकारी कर्मचारी महत्वाची भूमिका बजावत आहेत. असे असताना म्हसळा तालुक्यातील एका शिक्षकाने लॉकडाऊन व संचारबंदीचे उल्लंघन करून बेकायदेशीर काम केल्याची धक्कादायक घटना घडली होती. 
   याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसळा तालुक्यातील पाष्टी केंद्रांतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भापट या शाळेतील उपशिक्षक श्री.अजय सोपान केंद्रे (सदस्य - ग्रा.पं.कोळवट कोरोना संसर्ग नियंत्रण पथक) सध्या राहणार - म्हसळा (कर्जत येथील पत्ता :- गणेश सोसायटी, नानामास्तर मुद्रे, कर्जत) या शिक्षकाने दि.22 एप्रिल रोजी म्हसळा ते कर्जत असा मारुती सुझुकी गाडीने प्रवास करून बेकायदेशीररित्या व धोकादायक पध्दतीने आंब्याच्या पेट्या घेऊन जाण्याचे काम केले होते. 
बेकायदेशीररित्या आंब्याच्या पेट्या घेऊन म्हसळा ते कर्जत असा प्रवास केल्याचे आढळून आल्याने कर्जत पोलिसांनी अंदाजे दोन लाखांचा माल व एक मारुती सुझुकी व्हॅन जप्त करून संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल केला होता.
म्हसळा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांचे मार्फत घडलेल्या घटनेची सविस्तर चौकशी करुन मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांना अहवाल सादर केला होता. 
शिक्षक अजय केंद्रे यांनी मा.जिल्हाधिकारी रायगड यांनी कोविड 19 (कोरोना) संदर्भात वेळोवेळी दिलेले संचार बंदीचे आदेश माहीत असून देखील अवज्ञा करून बेकायदेशीररित्या व धोकादायक पद्धतीने प्रवास केल्याचे आढळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध भा.दं.वि.सं. कलम 269, 188 गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील नियम 3 चा भंग केलेला आहे. म्हणून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील तरतुदीनुसार 30 एप्रिल 2020 रोजी पासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात येत आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी निलंबन आदेश पत्रात नमूद केले आहे. 
संबंधित शिक्षक अजय सोपानराव केंद्रे यांनी केलेल्या कृतीबाबत सविस्तर चौकशी अहवाल गटविकास अधिकारी साहेबांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना पाठविला होता त्यानुसार सर्व चौकशी करून राजिप अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी दि.30 एप्रिल रोजी शिक्षक अजय केंद्रे याला निलंबित केले आहे असे म्हसळा शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांनी माहिती देताना सांगितले आहे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर