आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून इको वाहन चालकांना मदतीचा हात 

 


 

 

 

पनवेल(प्रतिनिधी) दररोजच्या प्रवासी वाहतुकीद्वारे कुटुंबाचा उदर निर्वाह चालविणाऱ्यांवर कोरोना व लॉक डाऊन परिस्थितीमुळे संकट आले आहे. अशा इको प्रवासी वाहतूक करणाऱ्या पनवेल तालुक्यातील १६०० चालकांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपच्यावतीने जीवनावश्यक अन्न धान्याचे वाटप करून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाहन चालकांना मदतीचा हात दिला आहे. 



          माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने आणि आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल परिसरात ३० हजार पेक्षा जास्त कुटुंबाना जीवनावश्यक अन्न धान्य देण्यात आले असून ठाकूर कुटुंबाकडून गरीब गरजूंसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. 

          पनवेल तालुका परिसरातील अनेक प्रवासी इको या चार चाकी वाहनाने प्रवास करीत असतात. सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊनमुळे प्रवास बंद आहे. त्यामुळे इको वाहनचालकांना दररोजचे आर्थिक उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे भाजपप्रणित वंदे मातरम रिक्षा चालक मालक संघटनेच्या मागणीनुसार आयटीआय नाका, पोदी विभाग, देवद, आकुर्ली, विचुंबे, नेरे, गावदेवी उसर्ली, पंचमुखी, तक्का-कर्नाळा, मालधक्का, उरण नाका, टेंभोडे वळवली आदी स्टॅन्ड नाका येथील १६०० इको वाहन चालकांना अन्न धान्य देण्यात आले आहे. 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर