मोरबे धरणाची पाणीगळती थांबणार पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात जलशयाखालील गावांवरील पुराचा धोका टळणार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल(प्रतिनिधी) मोरबे धरणाची पाणीगळती थांबण्याबरोबरच जलाशयाखालील गावांवरील पुराचा धोका टळणार आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होतो. याव्यतिरिक्त पावसाळ्यात बंधारा फुटुन त्याचा आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण झाला होता. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा सुद्धा केला. जर यंदा याबाबत उपाययोजना केल्या नाही. तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाने धरणाची डागडुजी सुरू केली आहे.
पनवेल तालुक्यातील खैरवाडी- गारमाळ परिसरात जवळपास ५० एकरावर हे धरण बाधण्यात आले आहे. या धरणाच्या पाण्याचा वापर आजूबाजूच्या गावातील शेतीसाठी तसेच मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांना पिण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे याच धरणातील पाण्यावरच गारमाळ, मोरबे,येरमाळ आदी परिसरातील नागरिक दुबार भाताचे पीक घेतात. या धरणाची क्षमता ३. २२ दशलक्ष घनमीटर धारण क्षमता असून ३. १२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असतो. पनवेल तालुक्यातीत पाणी टंचाई असताना धरणातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या धरणाची गळती थांबवावी अशी मागणी धरण क्षेत्रातील ग्रामस्थ करीत होते.
या धरणाची निर्मिती १९७३-७४ साली झाली असून मुख्य बांध हा दगडी भिंतीचा आहे आणि त्या भिंतीला तडे गेल्यामुळे यातून पाणी गळती होते. या बांधाला मधोमध भेगा पडलेल्या आहेत. धरणाचा बांध कमकुवत झाल्याचे ही परिस्थिती निर्माण झाली होती. या भागात पावसाचे प्रमाण खूप असते. परंतु जर अतिवृष्टी झाली तर हा बांध फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशी दुर्घटना घडली तर त्याचा फटका आजूबाजूच्या गावासह नवीन पनवेल ला बसण्याची शक्यता निर्माण झाली होती.याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंत्याना दिले होते. संबंधित अधिकाऱ्याने या जलाशयाची पाहणी केली . त्यानंतर क्षेत्रिय स्तरावर अंदाजपत्रक तयार करण्यात आले. परंतु कोरोना संकटामुळे काम सुरू होण्यास काहीसा विलंब झाला. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मोरबे धरणाची दुरुस्ती महत्त्वाचे असल्याने पाटबंधारे विभागाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment