माजी खासदार किरीट सोमैय्या यांची पनवेलला भेट  एमजीएम, इंडिया बुल आणि महापालिकेला भेट  कोरोनाग्रस्त रुग्णांच्या व्यवस्थेबाबत चर्चा आणि आढावा 




 




 

पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमैय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज एमजीएम कामोठे रुग्णालय, इंडिया बुल आणि महापालिकेला भेट देऊन रुग्णांवर सुरु असलेल्या उपचारासंदर्भात चर्चा करून व्यवस्थेचा आढावा घेतला. 
           कोविड १९ संसर्ग असलेल्या रुग्णांवर कामोठे एमजीएम येथे उपचार सुरु आहेत त्याचबरोबर कोन गावाजवळील इंडिया बुल येथे क्वारंटाईन सेंटर आहे. या ठिकाणी माजी खासदार किरीट सोमैय्या, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत महापौर कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर भेट देऊन येथील व्यवस्थेची पाहणी केली तसेच  रुग्णांना औषधे, भोजन वेळेवर देण्याबरोबर रुग्णांची योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना यावेळी तेथील वैद्यकीय तज्ञ् व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचबरोबरीने या लोकप्रतिनिधींनी महापालिकेला भेट देऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात चर्चा केली. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोना संदर्भात रुग्ण तपासणीचा अहवाल येण्यास वेळ लागत आहे तसेच तेथील यंत्रणेवर भार पडत आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीत पनवेलची स्वतःची तपासणी लॅब असावी, अशी सूचना किरीट सोमैया यांनी यावेळी आयुक्तांकडे केली. 




 

 


 



 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर