रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला म्हसळ्यात केराची टोपली...!


 

 

 जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बाजारपेठांच्या ठरवलेल्या वेळेत म्हसळाकर करत आहेत बदल

 

 ग्राहकांचे विकेंद्रीकरण होण्यासाठी सकाळी ९ ते सायं.५ वाजेपर्यंत शासनाचे बाजारपेठ सुरु रहावी.

 

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

 

शासनाने दिलेल्या लॉकडाऊन ४ मधील नविन सूचनांनुसार म्हसळा शहरासह सर्व जिल्ह्यात सायं ७ ते सकाळी ७ या कालावधीत संचारबंदी असून अत्यावश्यक कामा शिवाय नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे स्पष्ट आदेश आहेत. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आधिपत्याखालील क्षेत्रात नगरपालीका व नगरपंचायत क्षेत्रातील अत्यावश्यक व नव्याने आदेश दिल्याप्रमाणे दुकाने सकाळी ९ ते सायं ५ वाजेपर्यंत सुरु ठेवावी असे जिल्हाधिकारी रायगड यांचे स्पष्ट आदेश असताना म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंगळवार दि.२६ मे पासून म्हसळा बाजारपेठ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत उघडी ठेवावी व नंतर बंद ठेवावी असा निर्णय घेण्यात आला व तो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला. सध्या देशात चौथा लॉकडाऊन सुरू असून प्रत्येक वेळी लॉकडाऊनचे नियम व रायगड जिल्हाधिकारी यांचे आदेश नगरपंचायत प्रशासन व  म्हसळा तालुका प्रशासन आपल्याआपल्या परीने घेत असून त्यात बदल करीत असतात. आताही जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बाजारपेठांच्या ठरवलेल्या वेळेत म्हसळा नगरपंचायत, तालुका प्रशासन व शहरातील काही मोजकेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशात बदल करून दुकानांच्या वेळा बदलत असल्याने "रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला म्हसळ्यात केराची टोपली" दाखवली जात असल्याचे बोलले जात आहे. 

    सदर आयोजित बैठकीला तहसीलदार शरद गोसावी, मुख्याधिकारी मनोज उर्कीडे, सपोनी धनंजय पोरे, नगराध्यक्षा जयश्री कापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, हिंदू- मुस्लीम समाजाचे अध्यक्ष व विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ह्या वेळी फारुकभाई पेणकर व अन्य ग्राहक प्रतिनिधीनी ग्राहकांच्या खरेदीच्या वेळेत कमी जास्त करू नये अधिक वेळ असल्यास ग्राहकांची विभागणी होऊन सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल या अभ्यासू सूचनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले व बैठकीत मंगळवार दि.२६ मे पासून म्हसळा बाजारपेठ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत उघडी ठेवावी असा घातक व जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी ठरविलेल्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवार दि.२६ मे पासून म्हसळा बाजारपेठ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत उघडी ठेवावी हा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होताच तालुक्यातून तिव्र प्रतिसाद उमटू लागून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे अशा विविध प्रतिक्रिया तालुक्यातून येऊ लागल्या.

 

 उपविभागीय अधिकाऱ्यांचा कानावर हात तर म्हसळा प्रशासनाचा खुलासा....

  याबाबतचा निर्णय उपस्थितांनी घेतला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे पालन करणार असल्याचे तहसीलदार, सपोनी व नगरपंचायत मुख्याधीकाऱ्यानी सांगितले. मात्र उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन अमीत शेडगे यानी संबंधीत फोन अगर मेसेजला उत्तर देणे टाळले.

 

प्रतिक्रिया :-

 

"म्हसळा उपविभागीय अधिकारी, तालुका प्रशासन,कोव्हीड -१९ या राष्ट्रीय आपत्तीबाबत तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, पत्रकार यांचा योग्य तो समन्वय साधणे आवश्यक असताना अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतात त्याच कारणाने, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या बाबत मा.मुख्यमंत्री साहेब यांजकडे संघटनेच्या माध्यमातून तक्रार करणार आहे"

श्री.महादेव पाटील 

माजी सभापती तथा शिवसेना तालुका प्रमुख म्हसळा

 

फोटो :

शनिवारी घेण्यात आलेली सभा व या सभेला उपस्थित असलेले अधिकारी, पदाधिकारी

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर