देवदूत डॉ. मीनल भोसले यांची पत्रकारांना औषधरुपी केली अशीही मदत... 


 


 


 
 Covid19 या रोगाशी लढण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे पनवेल प्रेस क्लबच्या सर्व पत्रकारांना केले मोफत वाटप. 



 'स्टार पनवेल' वर्तमान पत्राचे संपादक तथा 'पनवेल प्रेस' क्लबचे उपाध्यक्ष लाख दिलाचा माणूस श्री. अनिल राय यांनी केले विशेष प्रयत्न. 


जितेंद्र नटे / पनवेल 
raigadmat.page


संपूर्ण जग हे कोरोना विषाणूशी लढत आहे. पोलीस, डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय, सरकार यांच्या समवेत पत्रकार ही लढत आहेत. सरकारी सेवेत असणाऱ्यांची काळजी सरकार घेत असतो. मात्र पत्रकार जगाला माहिती देऊन जन जागृती करण्याचे 'बिन पगारी, फुल अधिकारी' म्हणून काम जरी करीत असला, तरी त्याची दखल मात्र घेताना कोण दिसत नाही? उलट कितीही समाजासाठी केले तरी लोकांचे बोलणे मात्र त्याला एकूण घ्यावेच लागते. 
मात्र असल्या परिस्थितीतही काही लोक नक्कीच दखल घेताना दिसून येतात. पनवेल मधल्या अशाच एक उद्योनमुख - प्रतिभावंत डॉक्टर डॉ. मीनल भोसले या पत्रकारांसाठी देवदूत ठरल्या आहेत. त्यांनी Covid19 या रोगाशी लढण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे पनवेल प्रेस क्लबच्या सर्व पत्रकारांना मोफत वाटप केले. या अशा प्रकारे आपली ही कोणी काळजी करतात या भावनेनेच पत्रकार मंडळींना खूप बरे वाटले. यामुळे काम करण्याची नवीन उमेद मिळाली असल्याची भावना पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय कडू तथा अध्यक्ष श्री. सय्यद अकबर यांनी आभार मानून आपले 'मत' रायगड मत कडे व्यक्त केले. 
या पत्रकार मित्रांना मोफत औषधं मिळण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढण्यासाठी 'स्टार पनवेल' या वर्तमान पत्राचे संपादक तथा 'पनवेल प्रेस' क्लबचे उपाध्यक्ष लाख दिलाचा माणूस श्री. अनिल राय यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्यामुळेच ही मदत सर्व पत्रकार बंधूना मिळाली म्हणून सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानले. 


यावेळी ज्येष्ठ पत्रकार 'दै. वादळवारा'चे संपादक तथा 'पनवेल प्रेस क्लब'चे संस्थापक श्री. विजय कडू (अप्पा), अध्यक्ष तथा 'कोकण डायरी'चे संपादक श्री. सय्यद अकबर, 'रायगड मत'चे संपादक तथा 'पनवेल प्रेस क्लब'चे उपाध्यक्ष श्री. जितेंद्र नटे, 'स्टार पनवेल'चे संपादक व उपाध्यक्ष अनिलजी राय, 'अभेद्य प्रहार'चे संपादक प्रकाश म्हात्रे वे 'मतभेद'चे संपादक प्रमोद जाधव, 'रायगड टूडे'चे संपादक क्षितिज कडू, 'दै. पुढारी'चे पत्रकार श्री. राज भंडारी, 'तरुण भारत'चे पत्रकार संतोष वाव्हळ, 'क्षितिज पर्व'चे श्री. सनिप कलोते, जेष्ठ पत्रकार भारतकुमार कांबळे, असीम शेख, फजले आलम, सचिन वायदंडे, दैनिक शिवतेज पत्रकार विकास पाटील, माजी अध्यक्ष श्री. आनंद पवार, AM News चॅनलचे साहिल रेलेकर, शेख इम्रान, नावडेकर व पनवेल प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते. हा कार्यक्रम करीत असताना सर्वांनी फिजिकल डिस्टन्स या नियमांचा तंतोतंत पालन केले. 


raigadmat.page 


संपादक - जितेंद्र नटे 
रायगड मत वर्तमान पत्र 
Mo. 8652654519/ 9137595224


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर