मार्केटमधील गर्दीच्या नियोजनाकरिता व्यापारी प्रतिनिधींसोबत चर्चा


 


 


पनवेल(प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण नाका ते टपाल नाक्यादरम्यानच्या मार्केट परिसरातील बेबंद गर्दीचे नियोजन करण्याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापालिका आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर आणि व्यापारी प्रतिनिधींची नुकतीच सविस्तर बैठक झाली.
टपाल नाका ते उरण नाका परिसरातील गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. या गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे तसेच कोरोनासंदर्भामधील गंभीरता सर्वसामान्य लोकांना कळत नसल्यामुळे आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली, तसेच विभागनिहाय त्या त्या ठिकाणची मार्केट खुली करून लोकांनी आपापल्या विभागातीलच मार्केटमध्ये खरेदी करावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी बाळगण्यासाठी उपाययोजना करण्याचेही या वेळी ठरले.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर