कोकण हापूस " पहिला मोबाईल ॲप प्ले स्टोअर वर उद्यापासून उपलब्ध कोकण हापूसचे अत्याधुनिक डिजिटल मार्केटिंग देवगड रत्नागिरी केळशीचा ओरिजनल हापूस आणि कर्नाटकचे डुप्लिकेट हापूस
केमिकलचा, कार्बाइडचा वापर करून चार दिवसात आंबे पिकवणे, किंवा कर्नाटक चे हापूस सारखे दिसणारे डुप्लिकेट हापूस कोकणातल्या हापूस मध्ये मिक्स करणे, किंवा कर्नाटक आंबा देवगड रत्नागिरी हापूस म्हणून विकणे अशा गैरप्रकारांना मुळे मागील दहा पंधरा वर्ष कोकणातील हापूस बदनाम झाला. हापूसची ती जुनी जगप्रसिद्ध आंबट गोड चव, घरभर पसरणारा सुगंध, आणि तो केशरी रंग सर्वच हरवलं होतं.
पण करोना च्या या लॉकडाऊन मध्ये ग्लोबल कोकणने एक उपक्रम राबवला नैसर्गिक पद्धतीने गवताच पिकवलेला हापुस आंबा ग्लोबल कोकण हापूस या ब्रांड ने थेट सोसायट्यांमध्ये घरोघरी दिला. अशाच स्वरूपाचे उपक्रम कोकणातल्या शेतकऱ्यांनी आणि युवकांनी राबवले आणि त्यामुळे आंबा प्रेमी मुंबईकरांना पुणेकरांना हापूस ची जुनी चव सापडली. जगात कोकणातल्या हापूस आंब्याला तोड नाही भारत सरकारने कोकणातल्या हापूसला जी आय मानांकन दिले आहे. त्यामुळे यापुढे केवळ कोकणातल्या हापूसला हापूस म्हणता येईल अशी कायद्याने तरतूद झाली. आणि कोकणवासियांनी यापुढे हा दर्जेदार हापुस थेट ग्राहकांना देण्याचे ठरवले आहे.
यावर्षी कोकणभूमी प्रतिष्ठानने हापूस आंब्याचा कोकणचा ब्रँड विकसित केला. यापुढे ग्लोबल कोकण हापूस या नावाने सिंधुदुर्ग रत्नागिरी राजापूर देवगड गुहागर केळशी श्रीवर्धन अलीबाग येथील अस्सल हापूस आंबे खात्रीने घरा-घरात मिळू शकतील. हापूसची ती हरवलेली जुनी चव
विश्वासाने पुन्हा मिळू शकेल. प्रामाणिकपणे आपल्या शेतात प्रचंड परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांचा आंबा घरोघरी मिळू शकेल. यापुढे जाऊन मशागत करताना कोणतीही रासायनिक खते दिली नाही व रासायनिक फवारण्या केल्या नाही , सेंद्रिय शेती केली आशा आंबा बागांमधील नॅचरल हापूस हा ब्रँड ग्लोबल कोकण विकसित करीत आहे.
हे आंबे प्रीमियम किमतीत आंबा प्रेमी निसर्गप्रेमी ग्राहकांना उपलब्ध होती. मुंबई पुणे ठाणे नवी मुंबई वसई विरार या शहरांमध्ये सोसायट्यांना एकत्र येऊन ओरिजिनल हापूसची ऑर्डर देता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्लोबल कोकण ने " कोकण हापूस "
हा मोबाईल ॲप विकसित केला आहे. कोकणातील ओरिजनल हापूस आंब्याचे बुकिंग या मोबाईल ॲप वरून करता येईल. डिजिटल पद्धतीचा उपयोग करून आप वरूनच पेमेंट देता येईल.
ग्लोबल कोकण हापूस का मध्यमातून मागील पंधरा दिवसात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आजपर्यंत 5000 आंब्याच्या पेट्यांचे वितरण झाले आहे. खरा हापूस आंब्याचा सीझन मे महिन्यात असतो. मे महिन्यात अधिक चवदार, आकर्षक आंबा ग्लोबल कोकण हापूस च्या माध्यमातून हजारो घराघरांमध्ये पोहोचवण्याचा कोकणभूमी प्रतिष्ठान चा निर्धार आहे.
संजय यादवराव
अध्यक्ष कोकणभूमी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण
Comments
Post a Comment