लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त   रविवारी मोफत आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप

 


 

पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दिनांक २ जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्यावतीने रविवार दिनांक ३१ मे रोजी सकाळी १० वाजता ओवे कॅम्प येथील रहिवाशांना मोफत आर्सेनिक अल्बम३० होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून होणाऱ्या या कार्यक्रमाला  पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित राहणार आहेत. 

        लोकनेते रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आहेत. त्यांना कर्मवीर भाऊराव यांची शिकवण असल्यामुळे ते नेहमीच समाज हिताचे कार्य करत आले आहेत व त्याला अनुसरूनच त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे हा बोध घेत खारघर येथील ओवे कॅम्प येथील रहिवाश्यांना रोगप्रतिकार शक्ति वाढावी, यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितल्या प्रमाणे आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर