राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कोविड योध्यांना फेस शिल्डचे वाटप
पनवेल : राज भंडारी
राष्ट्रवादी काँग्रेस ट्रस्टच्या माध्यमातून कोविडसाठी झटणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह डॉक्टर, मनपा कर्मचारी आणि पत्रकारांना तब्बल ३००० फेस शिल्डचे वाटप पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले. बुधवारी पनवेलमधील पत्रकार बांधवांसह पालिकेच्या सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना या फेस शिल्डचे वाटप आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या आवारात करण्यात आले.
संपूर्ण देशभरात कोरोनासारख्या महामारीने आपले आक्राळ विक्राळ रूप धारण करण्यास सुरुवात केले, त्यामुळे या कोरोनाच्या युद्धामध्ये लढणाऱ्या योध्यांची काळजी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन खरंतर सामाजिक बांधिलकीचा वसा त्यांनी घेतला असल्याचे समोर आले आहे. ज्या दिवसापासून देशभरात संचारबंदी लागू झाली त्यावेळेपासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून भुकेलेल्यांच्या पोटात अन्नाचा घास भरविण्याचे काम या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले. तसेच या युद्धामध्ये अहोरात्र झटणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, वार्डबॉय यांच्यासह जनतेशी थेट संपर्कात येणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि संचारबंदीमध्ये कोणत्या ठिकाणी काय घडामोडी झाल्याचे याचा इतिवृत्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता काम करणाऱ्या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची काळजी घेण्याचे काम या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस ट्रस्टच्या माध्यमातून जिल्हाभरात ३००० फेस शिल्डचे वाटप तर पनवेलमध्ये पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून १३०० लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोविड योद्यांच्या या लाढ्यमध्ये त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच त्यांना या युद्धामध्ये अधिक स्फूर्ती आणण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या पनवेल शहर जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर, उपाध्यक्ष हर्षद लोखंडे, बेघर भिजणं समितीचे व्यवस्थापक अरुण कोळी, व्यवस्थापक विनय म्हात्रे, सहाय्यक व्यवस्थापक नवनाथ थोरात, लिपिक राजेश डोंगरे, लिपिक मोनिका डाके आदींसह पदाधिकारी मेहनत घेत आहेत.
Comments
Post a Comment