आईच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्याकडून वृध्दाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची भेट
पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या मातोश्री अनुसया हरि
करुणेश्वर वृद्धाश्रमात ४० ज्येष्ठ नागरिक आहेत. कोरोना विषाणू संसर्ग व लॉक डाऊन परिस्थितीचा विचार करता येथील ज्येष्ठ नागरिकांकरिता जीवनावश्यक अन्न धान्य, फळे, रोग प्रतिकार शक्ती औषधे, सॅनिटायझर आदी महत्वपूर्ण वस्तूंची राजेंद्र पाटील यांनी भेट दिली. यावेळी फिजिकल डिस्टन्स नियमाचे पालन करण्यात आले. यावेळी तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस महेश पाटील, अक्षय पाटील, राहुल पाटील, पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment