म्हसळा तालुका नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडीत सापडला कोरोना पाॅझीटिव्ह
शहरासह तालुक्यात घबराट उडाली
म्हसळा@रायगड मत / श्रीकांत बिरवाडकर
मुंबईतील बोरीवली येथील हॉटस्पॉट वस्तीतून आलेला दुर्गवाडी गावातील कॉरंटाईन असलेल्या ६० वर्षीय ईसमाचा दि १९ मे रोजी अचानक श्वसनाचे त्रासाने मृत्यू झाला होता. म्हसळा नगरपंचायत प्रशासनाने मृत्यू पश्चात स्वॅब घेऊन नवी मुंबई येथे तपासणीसाठी पाठविला होता. तो कोरोना पाॅझीटिव्ह निघाल्याने म्हसळा करांचे मनात घबराट झाली. म्हसळा तालुक्यातील नगरपंचायत हदीतील दुर्गवाडी गावातील ६० वर्षीय ईसमाचा स्वॅब कोरोना पाॅझीटिव्ह निघाल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले त्यामुळे शहर आणि तालुक्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. तालुक्यातील ३९ ग्रामपंचायती व म्हसळा नगरपंचायतीतील म्हसळा शहरासह नगरपंचायत हद्दीतील गौळवाडी, दुर्गवाडी, चिराठी, सावर गौळवाडी, बौध्द वाडी, या विविध वस्तींवर किमान 2000 चाकरमानी मुंबई वरून आले आहेत असे म्हटले जाते. त्यामध्ये दुर्गवाडी येथील ६० वर्षीय वृद्ध व्यक्ती १६ मे रोजी बोरीवली येथील हॉटस्पॉट वस्तीतून मुलगा, मुलगी व जावई यांच्या समवेत म्हसळा शहरांत आला, मुलगी व जावई त्यांच्या चिरगाव या गावी गेले, मयत इसम व मुलगा रिक्षाने दुर्गवाडी येथे आले नंतर २ते ३ दिवसात दुर्गवाडी येथे श्वसनाचे त्रासाने वृद्धाचा मृत्यू झाला. मृतदेहावर ठरवून दिलेल्या कार्यपद्धती प्रमाणे नगरपंचायत प्रशासनाने अंत्यसंस्कार केला. या प्रकारांत मुलगा, मुलगी,जावई व संबंधीत रिक्षाचालकाला प्रशासन कॉरंटाईन करणार आसल्याचे समजते. अद्यापपर्यंत शासनाने केवळ सुमारे ३०० ते ३५० वस्तीचे दुर्गवाडी क्षेत्र अगर मृत व्यक्तीचे घराभोवतीचे क्षेत्र Containment Zone म्हणून घोषीत केलेले नाही. म्हसळा नगरपंचायत चा कार्यभार ढिसाळ असल्याचे बोलले जातं आहे.
म्हसळा येथे कोव्हीड रुग्णालय नसल्याने सदर मयत झालेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 4 व तालुक्यातील इतर गावामधील 1 अशा 5 जणांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती म्हसळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश कांबळे यांनी 'रायगड मत'शी बोलताना दिली.
Comments
Post a Comment