आम्ही आमचे प्रयत्न करीत आहोत लोकांनी सहकार्य करावे - तहसीलदार म्हसळा
जे Red Zone मधून आलेले आहेत. त्यांनाच आम्ही 28 दिवस होम क्वारनटाइन रहा असे सांगत आहोत. तर जे Green Zone किंवा Orang Zon मधून आलेले आहेत त्यांना 14 दिवस असे आदेशच वरून आलेले आहेत.
तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या मार्फत त्या त्या गांवात 'गाव कमिटी' स्थापन करून होम क्वारनटाइन असणाऱ्या आणि इतर ग्रामस्थ मंडळींना सामान ने-आण करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत.
म्हसळा / जितेंद्र नटे @ रायगड मत
सध्या कोरोनाची चिंता ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. आधीच वैतागलेले 2 महिने लोकडाऊन अनेक मुंबईकर गावी गेल्यामुळे प्रशासनावर ताण पडत आहे. हे जरी खरे असले तरी तेही आपलेच आहेत त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. अनेक लोकांनी 'रायगड मत'शी संपर्क साधून तसेच व्हाट्सअप करून होम क्वारनटाइन 14 दिवस कि 28 दिवस या बाबत आक्रोश व्यक्त केला.
म्हणून 'रायगड मत' चे संपादक जितेंद्र नटे यांनी स्वतः म्हसळा तहसीलदार गोसावी यांच्याशी बातचीत केली.... काय उपाय योजना आहेत? या विषयी विचारले असता ते म्हणाले, कि आम्ही जास्तीत जास्त नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत आहोत. अनेक लोक मॅसेज पसरवून गैरसमज पसरवत आहेत. हे थांबले पाहिजे. आम्ही शासनाच्या आदेशाचे पालन करीत आहोत. जे Red Zone मधून आलेले आहेत. त्यांनाच आम्ही 28 दिवस होम क्वारनटाइन रहा असे सांगत आहोत. तर जे Green Zone किंवा Orang Zon मधून आलेले आहेत त्यांना 14 दिवस असे आदेशच वरून आलेले आहेत. आम्ही आदेशाचे पालन करून लोकांचे रक्षणच करीत आहोत. आजही वारळ येथे होम क्वारनटाइन व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्याचे swab टेस्टिंगसाठी पाठविले आहे. ही म्हसळ्यातली दुसरी घटना आहे. त्यामुळे जनतेने ही आम्हाला सहकार्य करावे, जास्तीत जास्त घरीच राहावे अशी विनंती त्यांनी 'रायगड मत'चे संपादक जितेंद्र नटे यांच्याशी फोनवरून बोलताना केली.
लोकांचे राशनपाणी किंवा इतर गोष्टी शहारातून आणण्याचे झाले तर हाल होत आहेत? लोक रायगड मत ला फोन करून विचारत आहेत? याबद्दल विचारले असता, 'आम्ही त्यासाठी तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या मार्फत त्या त्या गांवात 'गाव कमिटी' स्थापन करून होम क्वारनटाइन असणाऱ्या आणि इतर ग्रामस्थ मंडळींना सामान ने-आण करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. सध्या मे महिना असल्यामुळे पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे प्रशासन दुहेरी तोंड देत आहे. नुकतेच आम्ही नेवरुळ गावाला टँकर ने पाणी पूरवठा केले आहे. लोकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे शासन प्रयन्त करीत आहे आपण सर्वांनी मिळून कोरोना ला हरवायचे आहे त्यासाठी जनतेने सहकार्य करावे आणि पुढील सूचना आली तर आम्ही होम क्वारनटाइन चा कालावधी नक्की कमी करू असेही सांगायला ते विसरले नाहीत. मास्कचा वापरा करा आणि नियमांचे पालन करून आपली दुकानें आणि कामकाज सुरु ठेवावी असे सरते शेवटी त्यांनी आपले मत 'रायगड मत'शी व्यक्त केले. tahsilmhasala@gmail.com
टीप : ही बातमी सर्वत्र फॉरवर्ड करा, जेणेकरून जनजागृती होईल. तहसीलदार साहेब म्हणाले आहेत कि, "आम्ही कमिटी नेमल्या आहेत. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, गाव कमिटी यांच्या मार्फत आम्ही काम करीत आहोत. " मात्र हे कोण काम करीत नसतील तर 'रायगड मत' जितेंद्र नटे मो. No. 8652654519 या no वर व्हाट्सअप करा किंवा फोन करा. काही अडचण, त्रास असेल तरच संपर्क करा. 'रायगड मत' नक्की जनतेच्या पाठीशी उभा असेल. मात्र आपण घरीच रहा आणि काळजी घ्या तब्येत बिघडत असेल मनामध्ये संशय असेल तर ताबडतोब हॉस्पिटल किंवा आपल्या गाव कमिटी कडे संपर्क साधा आणि उपचार घ्या. आणि हो चुकूनही आपले आमदार, मंत्री, खासदार, तसेच तालुका अध्यक्ष, इलेक्शनच्या वेळी भेटणारे "ते" नेते, (गावात भानगडी लावून तो मी नव्हेच) असे पदाधिकारी यांना चुकून पण फोन करू नका? का? कारण ते सध्या गायब झाले आहेत. लोकांना मदत करायला होईल म्हणून, "होम क्वारनटाइन" झाले आहेत. असो आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे त्यासाठी आपणच आपली सुरक्षित काळजी घ्या? मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका. आपल्याला कोण मदत करणार नाही काही बरे वाईट झाल्यावर हे लक्षात ठेवा.
- ✍️आपलाच गाववाला, आपल्या सारखा सामान्य माणूस - जितेंद्र नटे (पत्रकार तथा संपादक - रायगड मत) 8652654519, raigadmat@gmail.com, raigadmat.page (दररोज 'रायगड मत' ची वेबसाईट वाचा आणि आजीवन सभासद सुद्धा बना.) सोबत ऑडिओ क्लिप आहे तो ऐका.
Comments
Post a Comment