एक हात मदतीचा साई संस्थान पुनाडेचे संस्थापक सदानंद पाटील यांच्या माध्यमातून ६० आदिवासी बांधवाना अन्नधान्याचे वाटप
कळंबोली / विकास पाटील
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. कोरोना विषाणूवर मात करताना देशासह राज्यात लाँकजाऊन आहे त्यामुळे हाताला काम नसल्याने पुनाडे ( उरण ) आदिवासी बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे अपात्कालीन संकट कालात सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाप्रती काही देणं लागते या भावनेतून साई संस्थान पुनाडेचे संस्थापक सदानंद पाटील यांच्या हस्ते महेश्नरी फाऊंडेशन व जीवन गागरे यांच्या सहकार्यातून ६० आदिवासी बांधवाना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊमुळे सर्व व्यवसाय बंद असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या द-याखो-यात व डोंगरमाध्यावर बसलेल्या आदिवासीना बसत आहे. लाँकडाऊनमध्ये गावच्या सीमा बंद केल्याने रानमेवा, सरपणे विकूणे व मिळेल तिथे काम करून आपले कुटूंब चालविणा-या पुनाडे आदिवासी बांधव कोरानाच्या दहशत परिस्थितीत अगदी हतबल झाला आहे. निराधार महिलाना मुलांचा उदरनिर्वाह कसा होईल हा यक्ष प्रश्न पडला आहे. या आदिवासी व निराधाराना एकवेळच जीवन मिळणे मुश्किल होवून उपासमारीची वेळ आली आहे असा संकट प्रसंगी साई संस्थान पुनाडेचे सदानंद पाटील व प्रकाश पाटील यांनी पुढे येवून मदतीचा हात देत महेश्वरी फाऊंडेशन व जीवन गांगरे यांच्या सहकार्यातून देण्यात आलेले अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप ६० आदिवासी कुटुबाना करण्यात आले. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचा उपक्रम सदानंद पाटील यांनी सुरू केला आहे आता पर्यत त्यांनी पुनाडे , वशेणी , पुनाडे आदिवासी वाडी व दादर ( पेण ) येथील ३५० गोरगरीबाना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप नंदा बाळाजी डाकी , कुंदा जितेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी अनंत पाटील , विमल पाटील, नंदा बाळाजी डाकी, कुंदा जितेंद्र म्हात्रे, विजय ठाकूर , महानंदा ठाकूर, अपुर्व पाटील ज क पाटील , अशोक पाटील उपस्थित होते . सदानंद पाटील यांचे या गावातून अभिनंदन केले जात आहे.
Comments
Post a Comment