कुणबी समाज ठाकरोळी विभाग यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील चिरगाव सडकेची वाडी (सितपाचा कोंड) येथे म्हसळा तालुका कुणबी समाज ठाकरोळी विभाग मुंबई यांच्या तर्फे शनिवारी तालुक्याचे गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांच्या उपस्थितीत समाजातील गोर गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ठाकरोळी विभाग कुणबी समाज मुंबई अध्यक्ष रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात, वाडीवर जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले आहेत. यावेळी विभागीय अध्यक्ष रमेश शिंदे,
उपाध्यक्ष संतोष घडशी, सल्लागार राजु जाधव, शंकर तिलटकर, गजानन शिंदे, ग्रामिण उपाध्यक्ष मोहन शिंदे, सहदेव खामकर, सुरेश कुळे, ग्रामिण सहसचिव मंगेश मुंडे, युवक अध्यक्ष सुनील शेडगे, संदिप मोरे, प्राथमिक शिक्षक जयसिंग बेटकर सर, प्रमोद कापडी, युवक सेक्रेटरी महेंद्र जाधव, क्रिडा अध्यक्ष सुरेश शिंदे, खजिनदार रामचंद्र खेरटकर, मंगेश आग्रे, गणेश भुवड, समिर खेरटकर, रूपेश शिगवण, अंकुश कांबळे, चेतन मोरे, सुनील आग्रे, अभि मोरे, प्रदिप मोरे आदी विभागीय पदाधिकारी यांनी सामाजिक भावनेतून समाजातील गरजू नागरिकांना अडचणीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यास मोलाचे सहकार्य केले.
यावेळी ठाकरोळी विभागातील चिरगाव सडकेची वाडी, चिरगाव धरणाची वाडी, चिरगाव बागेची वाडी, ताम्हणे करंबे, भापट, रातीवणे, कोळवट, श्रीकृष्ण वाडी, कोकबल, रूद्रवट, चिराठी, न्यु अनंत वाडी, ठाकरोळी, सांगवड, तोराडी, पांगळोली, पाणदरे, कुडगाव, पाष्टी, ताम्हणे करंबे वाडी असे २० गावात जीवनावश्यक वस्तूंचे किट प्रत्येक गावात पाच या प्रमाणे १०० किटचे वाटप करण्यात आले.
कुणबी समाज ठाकरोळी विभाग मुंबई यांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर अडचणीच्या काळात सढल हाताने गरजू लोकांना सहकार्य करण्याचे हाती घेतलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे असे मत गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी व्यक्त केले. .
सध्या जगात, देशात, राज्यात, आणि स्थानिक पातळीवर या कोरोना आजारा बाबत चालू वस्तूस्थीती पाहता सामाजिक दृष्टीकोनातून हाती घेतलेले कार्य ठाकरोळी विभागाला भविष्यात प्रेरणा देणारा आहे.
या नियोजनासाठी कुणबी समाज ठाकरोळी विभाग मुंबईचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपआपल्या परीने हस्ते परहस्ते सहकार्य केले असल्याचे ठाकरोली विभाग कुणबी समाज मुंबई अध्यक्ष रमेश शिंदे यांनी माहिती देताना सांगितले.
Comments
Post a Comment