दुर्दैवी हताश कोकणी माणूस!  मुंबई करांचा संयम आता सुटत चालला.  Lokdown ने घेतला आपल्या बहिणीचा बळी


 


 


 


माणगाव / जितेंद्र नटे
रायगड मत 
raigadmat.page 


आज Lokdown उठेल, उद्या उठेल म्हणून चाकरमानी वाट पाहत राहिला. पण कुणाला याची पर्वा ना राहिली. माणगाव येथे अशीच एक हृदय द्रावक घटना घडली. नालासोपारा वरून श्रीवर्धन कडे निघालेली सलोनी देवेंद्र बांद्रे (वय ३०) ही आपली बहीण Lokdown ची हकनाक बळी गेली. पती देवेंद्र दत्ताराम बांद्रे व मुलांसह चालत आपल्या मूळ गावी श्रीवर्धन तालुक्यातील मारळ येथे निघाल्या होत्या. रस्ता तुडवत तुडवत हे कुटुंब बुधवारी (६ मे)ला दुपारी माणगावपर्यंत कसेबसे पोहोचले. उन्हातान्हातून चालून थकल्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले आणि त्या चक्कर येऊन खाली कोसळल्या. तिथेच घात झाला. माणगाव पासून आपण आता घराच्या जवळ आलो आहोत या आशेने त्या घराच्या ओढीने न थांबता चालत होत्या. मात्र तिचे प्रयत्न अपयशी ठरले. Lokdown ने तिचा बळी घेतला. 
का गेली ती पायी चालत? काय कारण आहे. त्याचे? कारण ही भयानक आहे. हातात काम नाही आणि पैसा ही नाही. मग करणार काय? आणि 
Lockdown उठेल याची काही ग्यारंटी नाही. सरकार तर काही स्थानिक लोकांसाठी करीत नाही. याची जाणीव झाल्यामुळे कोकणातील तसेंच इतर जिल्ह्यातील अनेक लोक पायी चालत जायला निघालेले दिसत आहेत. दुर्दैवी कोकणी चाकरमानी हताश होऊन वाट पाहत आहे st कधी सुरु होईल. पण सरकार मात्र आश्वासन देत आहे. परदेशीं अडकलेल्या साठी 64 विमान फेऱ्या तेही मोफत, परप्रांतीय यूपी, बिहारींसाठी मोफत ट्रेन, जेवण आणि स्थानिक लोकांना काही ही व्यवस्था नाही. मग आपले नेते करतात काय हा प्रश्न सध्या प्रत्येक व्यक्ती एकमेकांना विचारताना दिसत आहे. आपण इथले स्थानिक असून काय फायदा? बर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर जिल्ह्यातील मुंबई पासूनचे अंतर किती? जेमतेम कुणाचे 3 तास कुणाचे 6 तास तर कुणाचे 8 तास मग st चे प्लांनिंग करून किंवा ट्रेनचे प्लॅनिंग करून आपल्या लोकांना स्थानिकांना आपल्या गावी पाठविणे शक्य होते/आहे. पण यांना बाहेरच्यांची काळजी जास्त आणि आपली लोक ती बसलीयेत सहन करत. जर st बस सोडण्याचे नियोजन वेळीच झाले असते तर त्या महिलेचा हकनाक बळी गेला नसता. बाहेरच्यांना भरपाई 5 लाख आणि स्थानिकांना ठेंगा का? त्या दुर्दैवी महिलेचा मृत्यू Lokdown मुळे झाला आहे. तिचे दोन्ही मुले आज रस्त्यावर आली आहेत. त्यांचे काय? त्यांना मदत नको का मिळायला. त्यांना मदत मिळालीच पाहिजे अन्यथा लोक जनआंदोलन करतील हे लक्षात ठेवा. मुंबई करांचा संयम आता सुटू लागला आहे. आपले कोकणचे नेते काहीच कसे करीत नाहीत. आज 2 महिने होत आहेत, ना नोकरी, ना हातात पैसा, ना अन्न धान्य मग जगायचे कसे? मुंबईत जगायचे म्हणजे दिवसाला हजार रुपये खर्च आहे. आतां इन्कम थांबले आणि खर्च चालूच आहे. काय करावे काय नाही या संभ्रमात विचार करुंन करून डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली आहे. जर आता काही प्रशासनाने केले नाही तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कोरोना राहिला बाजूला इथे उपाशी मरण्याचीच भीती जास्त वाटू लागली आहे आणि कोरोना होण्याची भीती आहे ती वेगळीच. त्यापेक्षा आम्हाला गावी जाऊ द्या निदान स्वतःच्या घरी सुरक्षित तरी राहता येईल अशी भावना लोक बोलू लागली आहेत. 'रायगड मत' ने या अगोदर सुद्धा आवाज उठवला होता आणि आताही आवाज उठवत आहे. गरज आहे ती जनतेच्या एकीची. चला सगळे एक होऊ आणि प्रशासनाला जागे करू. मात्र हे करीत असताना घाई करू नका काळजी घ्या. सध्यातरी घरीच रहा, सुरक्षित रहा. ज्यांच्यामुळे आपल्या बहिणीचा हकनाक बळी गेला आहे त्या प्रशासनाला जागे करू या. 


पत्रकार जितेंद्र नटे 
(संपादक रायगड मत) 
raigadmat.page
Mo. 8652654519 / 9137595224


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर