भारतीय जनता युवा मोर्चा पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरुन काढणार - जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर



पनवेल(प्रतिनिधी)  रक्ताची गरज लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चा पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरुन काढणार आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली आहे. 

        कोविड-१९ महामारीदरम्यान अनेक अन्य रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रक्ताचा तुटवडा असल्याचे विविध रक्तपेढ्या व हाॅस्पिटल्स कडुन माहिती मिळत आहे.  विशेष करुन थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्ताची वारंवार गरज लागते. भारतीय जनता पार्टीच्या युवकांची फळी अनेक समाजोपयोगी उपक्रमांत नेहमीच अग्रेसर आहे. भाजपा उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोशल डिस्टन्सिंग पाळत मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन विशेषत: टाटा कॅन्सर रुग्णालय रक्तपेढी, एमजीएम व रोटरी, खांदा काॅलनी येथील रक्तपेढयांना रक्ताचा पुरवठा केला. त्याच बरोबर गरजूंना अन्नधान्य वाटप, जेवण वाटप, प्रवासी पास काढून देण्यासाठी मदत इ. उपक्रमांत हिरहिरीने सहभाग नोंदवला. तरी सध्या सगळीकडे रक्ताचा तुटवडा असल्याचे लक्षात येता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत संपुर्ण ताकदीनिशी येता दहा दिवसांत १००० रक्त पिशव्यांचा संकल्प केला आहे. यासाठी दि.२४ मे ते २ जून २०२० दरम्यान जिल्हाभर सोशल डिस्टन्सिंग पाळत रक्तदानाचे उपक्रम करण्यासंदर्भात योजना करुन कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत नागरिकांनीदेखील सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे. 


सध्या युवामोर्चाने ऑनलाईन वकृत्व स्पर्धा, काव्य स्पर्धा, आकर्षक मास्क तयार करणे, घरात राहूनच फोटोग्राफी इ. सारख्या अभिनव स्पर्धा संपुर्ण महाराष्ट्रात घेत आहेत त्यात जिल्ह्यातील युवकांचा सहभाग वाढावा यासाठी देखील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
रक्ताची गरज असल्यास अथवा रक्तदानासाठी ईच्छुक असल्यास पनवेल शहर : रोहित जगताप ८६९१९३०७०९, पनवेल ग्रामीण : आनंद ढवळे ९७७३९४७७७७, कामोठे : हर्षवर्धन पाटील ७७१५०४८१८१, कळंबोली : अमर ठाकूर ८७६७१७१०१०, खारघर : विनोद घरत ९८२१६९९०९०, कर्जत : प्रमोद पाटील ९८५००५७३७८, खालापूर : प्रसाद पाटील ९२७३२७००९४, खोपोली : अजय इंगूळकर ९५४५४७८६६६, उरण : शेखर पाटील ९०८२५५३९५४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मयुरेश नेतकर यांनी केले आहे. 



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर