तळा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव. तळेगाव येथे आढळला पहिला कोरोना पॉझिटीव्ह.
(तळा श्रीकांत नांदगावकर)
रायगड जिल्ह्यातील तऴा शहरापासून ७ किमी.अंतरावर असलेल्या तऴेगांव गांवातील एका २० वर्षीय युवकाचा कोरोना चाचणी अहवाल पाँझिटीव्ह आला आहे सदर युवक मुंबई धारावी (कंटेंटमेंट झोन) येथुन ७ मे रोजी गावी आला होता.त्याला ताप येत असल्यामुळे ८ मे ला त्याला माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज दि १२ मे रोजी या युवकाचा अहवाल पाँझिटीव्ह आल्यानंतर त्याला आरोग्य विभागाकडुन पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे समजते.त्याच्या सोबत असलेली त्याची आई आणि भाऊ यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांचा कोरोना अहवाल येणे बाकी आहे. या तिघांना मुंबईहुन गावी घेऊन येणाऱ्या ड्राइव्हर ला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.जागतिक आपत्ती कोरोना संसर्ग टाऴण्यासाठी राज्य व केंद्रशासन महत्वाची जबाबदारी पेलत असताना लोकांच्या मागणीप्रमाणे झोन प्रमाणे लाँकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुऴे मुंबई -पुणे सारख्या शहरातील चाकरमानी यांचा मुऴ गावाकडे परतण्याचा ओघ वाढला आहे,खाजगी वाहनाने ,शासकिय परवानगीने तर काही चाकरमानी पायी चालत गावाकडे परतत आहेत मात्र दक्षतेची भुमिका न घेतल्यास कन्टेनमेंट झोन मधुन आलेल्या नागरिकांमुऴे कोरोना संसर्ग ग्रामीण भागात झपाट्याने पसरण्यास वेऴ लागणार नाही असे जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे.तसेच कन्टेंनमेंट झोनमधुन नागरिक गावी परततातच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment