जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि Hahnemanian Homoeo आणि ऑल ईज़ वेल होमिओपथिक यांच्याकडून आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचे वितरण
पनवेल : संपूर्ण देशभर कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विषाणू सोबत लढण्याकरिता जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि Hahnemannian Homoeo forum आणि ऑल ईज़ वेल होमिओपथिक या संस्थेकडून आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीचे औषध नागरिकांना वितरण करण्यासाठी डॉ. प्रतिमा सचिन म्हात्रे आणि डॉ. मृनल नार्वेकर यांनी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेकडे सुपूर्द केले आहे.
संबंधित औषध हे होमिओपॅथीचे औषध असल्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तसेच हे औषध कोणत्याही औषधासोबत घेता येते, त्याच प्रमाणे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला तसेच इतर आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात इ. असलेल्या व्यक्तींनाही देता येते. असे डॉ. प्रतिमा म्हात्रे आणि डॉ.मृणाल नार्वेकर यांनी सांगितले आहे.
सध्या covid-19 या आजाराचा संसर्ग वाढत आहे नागरिकांनी केंद्रीय मंत्रालयाच्या आयुष्य मंत्रालया मार्फत केलेल्या सूचनांचे पालन केल्यास हा आजार आटोक्यात आणू शकतो नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये आपले व आपल्या कुटूंबियांनची काळजी घेत दैनंदिन जीवन जगावे अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध उपयुक्त आहे. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते, तथा जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्या परवानगीने ह्या औषधांचे वितरण पालिका कामगार,पोलीस कर्मचारी, आणि नागरिकांना करण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे शेकापचे पालिका चिटनीस गणेश कडू यानी होमिओपॅथी औषध पालिका कामगारांना देण्यासाठी सुपूर्द करण्यात आले.
Comments
Post a Comment