सायनीत नऊ कोरोनाबाधित


 

रसायनी--राकेश खराडे

 

      कोरोना या विषाणूची जगात जबर दहशत पसरली आहे.ह्या विषाणूनी क्षणात होत्याचं नव्हतं केल.सर्वसामान्य माणसाची गत ना घर का,ना घाट का होत असतानाच उच्चब्रू लोक सुध्दा आपल्या दैनंदिन जिवन जगत असताना हवालदिल होत आहेत.दोन महिन्यांपर्यंत सुरक्षित असलेल्या रसायनीत अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर वाडी येथील तिघांची कोरोना चाचणी पाॅजिटीव्ह,दुर्गांमाता काॅलनी दोन पाॅजिटीव्ह,कैरे जवलील एका कारखान्यातील एक पाॅजिटीव्ह तर वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील एकाच कुटूंबातील तिघांची  चाचणी पाॅजिटीव्ह आली असून रसायनीत एकूण नऊ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून परीसरात भितीचे वातावरण आहे.या पाश्र्वभूमीवर शिवनगरवाडी परीसर कोरोना विषाणु बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.या कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.तर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम प्रशासनाच्यावतीने मंडळ अधिकारी नितिन परदेशी घेत आहेत.

     संपुर्णं देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे.लाॅकडाऊन कालातीत दोन महिने रसायनीकरांनी काटेकोर पालन केले.परंतु दोन महिन्यांनंतर कोरोनाने रसायनीत शिरकाव करुन नागरिकांना भयभीत केले आहे.शिवनगरवाडीत एकाच कुटूंबातील तिघांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅजिटीव्ह आले असून त्यांच्या अकरा वर्षीय मुलाचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.तसेच रिस नविन वसाहत हद्दितील दुर्गांमाता काॅलनी परीसरातील पती पत्नी दोघे कोरोना पाॅझिटीव्ह असून त्यांच्या दोन मुली व आई वडीलांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे.तसेच कैरे गावाजवळील एका कंपनीत चिफ मेंटेनन्स इंजिनिअर पदावर काम करणाऱ्या एकाचा कोरोना तपासणी अहवाल पाॅजिटीव्ह आला आहे.तसेच  वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील तरुणासह त्याच्या आई वडीलांचा कोरोना तपासणी अहवाल पाॅजिटीव्ह आला असून रसायनीत नऊ कोरोणाबाधित सापडले आहेत.तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

        रसायनीकरांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची काळजी घेवून सोशल डिस्टिंक्शनचे नियम तंतोतंत पाळावे असे आवाहन होत आहे.कोरोनाला घाबरून न जाता स्वता: बरोबर कुटूंबाची कालजी घ्यावी. एकमेकांना आधार देऊन ह्या संकटकाळात हि घट्ट पाय रोवून उभे राहा. घरगुती उपाय म्हणून प्रत्येकाने एक ग्लास पाणी,एक चमचा हळद,चार मिरी व चार लवंग थोडे ठेचून,सहा ते सात तुलशी पाने,थोडे अद्रक बारीक एकत्र करून पाच मिनिटे उकलवून प्यावे व काढ्यातील मिश्रण चावून खावे असा सध्या दिवसाचा दिनक्रम असावा असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर