पालकमंत्री नाम.आदिती तटकरे यांची म्हसळा आय.टी.आय.ला भेट

 

 कोव्हीड केअर सेंटर तयार करणार

 

सर्वांनी काळजी घेण्याची केले आवाहन

 

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

 

संपूर्ण जगाला डोकेदुखी ठरलेला कोविड 19 कोरोना व्हायरस ला सामोरे जाण्यासाठी व धैर्याने सामना करण्यासाठी संपूर्ण राज्याने कंबर कसली आहे. रायगडच्या पालकमंत्री नाम.आदितीताई तटकरे यांनी कोविड केअर सेंटर बाबत आढावा घेण्यासाठी म्हसळा आगरवाडा-वरवठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन भविष्यात उद्भभवणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या दृष्टीकोनातून केअर सेंटर तयार ठेवण्याच्या दृष्टीने तहसीलदार शरद गोसावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश मेहता, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश कांबळे आदींशी चर्चा करून सद्य परिस्थिचा आढावा घेतला. 

पालकमंत्री नियमितपणे रायगड प्रशासनाशी संपर्क ठेवून आहेत. या काळात जनतेनी काळजी घेण्याची आवश्यकता असून जनतेनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी आजपर्यंत संयम राखून कोरोनाचा तालुक्यात कुठेही शिरकाव होऊ न दिल्याबद्दल त्यांनी म्हसळा तालुक्यातील जनतेला धन्यवाद देऊन पुढील घातक काळात अशाच प्रकारचे सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुंबईसह इतर जिल्ह्यातून तसेच राज्यातुन आलेल्या मूळ रहिवाशी लोकांकडून किंवा इतर कारणांनी पुढील काळात कोरोनाचा शिरकाव म्हसळा मध्ये झालाच तर त्यासाठी उपाययोजना म्हणून कोरोना केअर सेंटर उभारण्याच्या सूचना आदिती तटकरे यांनी या आधीच प्रशासनाला दिल्या होत्या.

या वेळी प्रांताधिकारी अमित शेडगे,उपविभागीय पोलीस अधिकारी बी.एन.पवार,तहसीलदार शरद गोसावी,गटविकासधिकारी वाय.एम.प्रभे,नगराध्यक्षा जयश्री कापरे, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे,उपनगराध्यक्ष सोहेब हालडे,सभापती उज्वला सावंत,उपसभापती मधुकर गायकर,समीर बनकर,नाजिम हसवारे, माजी सभापती छाया म्हात्रे, चंद्रकांत कापरे,मंडळ अधिकारी राम करचे,संतोष (नाना) सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

 बैठक संपल्यानंतर आदिती तटकरे यांनी उभारल्या जाणाऱ्या कोविड केअर सेन्टर्सना प्रत्यक्ष जाऊन त्या त्या ठिकाणची पाहणी करून त्याठिकाणी डाॅक्टर्स व पोलिसांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, जेवणाची उत्तम सोय व्हावी याकरीता किचन असावे त्याठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात यावे तसेच रूग्णांच्या तपासणी करीता स्वतंत्र आरोग्य तपासणी कक्ष तयार करण्याच्या सुचना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.

 

 

सोबत फोटो-

म्हसळा तालुक्यात कोविड केअर सेंटर स्थापन करण्याबाबत वरवठने-आगरवाडा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीची पाहणी करताना पालक मंत्री आदिती तटकरे सोबत मान्यवर

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर