कोरोना पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची तळा तालुक्याला भेट. जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना गावी परत पाठविण्याचे नियोजन.
(तळा श्रीकांत नांदगावकर) कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तळा तालुक्याला भेट देऊन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.याप्रसंगी तहसीलदार ए.एम.कनशेट्टी, गटविकास अधिकारी विजय यादव,पो.नि. सुरेश गेंगजे,मुख्याधिकारी माधवी मडके,वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल बिरवटकर व पत्रकार बांधव उपस्थित होते.लॉकडाऊन मुळे इतर जिल्ह्यातील व राज्यातील कामगार,मजूर व नागरीक रायगड जिल्ह्यात अडकून पडले आहेत त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठविण्यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील व राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर काम करतात आतापर्यंत जवळपास साठ हजार मजुरांनी गावी परत जाण्यासाठी अर्ज केले आहेत या मजुरांसाठी ज्यावेळी त्यांच्या राज्यातून आपल्याला परवानगी मिळेल त्यावेळी त्यांना आपण रेल्वेची सुविधा उपलब्ध करणार आहोत.आजपर्यंत तीन रेल्वेने आम्ही नागरिकांना मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये पाठविले आहे व आज रोजी दोन रेल्वे गाड्या आपण ओडिसा आणि मध्यप्रदेश साठी पाठविणार आहोत दि.१० रोजी झारखंड साठी रेल्वे सोडणार आहोत.तसेच रायगड जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील जे मजूर अडकलेले आहेत त्यांना त्यांच्या स्वखर्चाने व एसटी बसेस च्या माध्यमातून त्यांच्या गावी पाठविण्याचे नियोजन केलें आहे.यांशिवाय ज्या नागरिकांनी स्वतःच्या गाडीने गावी जाता यावे म्हणून पास साठी अर्ज केले होते आशा चौदा हजार पासेसना मंजुरी देण्यात आली आहे.कोणत्याही नागरिकाला आरोग्य केंद्रात जाण्याची गरज नाही, नागरिकांनी जेथे आहात तेथेच राहावे आमची यंत्रणा तुमच्यापर्यंत पोहचेल व तुमची आरोग्य तपासणी करून तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात येईल.रायगड जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होणार आहे त्यामुळे लॉकडाऊन तीन मध्ये शेतकऱ्यांसाठी कुठल्याही पासेसची गरज नाही जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने सर्व शेतकरी त्यांच्या शेतामध्ये शेतीचे काम करू शकतात.शेतकऱ्यांचे बियाणे व खत शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहचता यावेत यासाठी बैठक घेण्यात आली होती व तळा महाड पोलादपूर सारख्या दुर्गम भागात गावोगावी व दुकानांपर्यंत बियाणे पोहचतील याचे नियोजन करण्यात आले आहे तसेच शेती व मनरेगाची जी अन्य कामे आहेत ती सुरू करण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी तळ्यातील पत्रकारांमार्फत तालुक्यातील आरोग्य केंद्रातील रिक्त पदांबाबत देण्यात आलेल्या निवेदनाचा लवकरच विचार केला जाईल असे आश्वासन मा.जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
Comments
Post a Comment