विवाहाच्या वाढदिवसानिमित्त म्हात्रे दाम्पत्यांकडून महापौर सहाय्यता निधीस ५० हजाराची आर्थिक मदत
पनवेल(प्रतिनिधी) विवाहाचा ५० वा वाढदिवस म्हणजे सुवर्णमहोत्सवी लग्न वर्ष. आणि हा दाम्पत्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा आणि जोडीच्या यशस्वी जीवनाची वाटचालीचा सुवर्ण क्षण असतो, त्या अनुषंगाने ५० वा विवाह वाढदिवस म्हणजे एक सोहळाच असतो व तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण पनवेलमधील के. जी. म्हात्रे व त्यांच्या सुविद्य पत्नी उर्मिला म्हात्रे यांनी विवाहाचा वाढदिवस उत्सव म्हणून साजरा न करता ५० हजार रुपयांची आर्थिक मदत महापौर सहाय्यता निधीस देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
पनवेल पंचायत समिती कार्यालयातील सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक व सध्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल जनसंपर्क कार्यालय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले के.जी म्हात्रे व त्यांच्या पत्नी पनवेल नगरपालिकेच्या सेवानिवृत्
Comments
Post a Comment