# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत. रायगड मत / जितेंद्र नटे raigadmat.page रायगड मध्ये शिवसेना (उबाटा) चे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे उद्या फॉर्म भरणा. श्रीवर्धन मतदार संघात चर्चेला एकच उधाण. रायगड दक्षिण शिवसेना उभाठा गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे पदाचा राजीनामा देणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून श्रीवर्धन मतदार संघातून तुतारी वाजविणार . राज्यात सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. रायगड जिल्ह्यात
वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट म्हसळा (प्रतिनिधी)@रायगड मत म्हसळा तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव म्हणजे वाडांबा गाव. सामाजिक, शैक्षणिक कार्यात या गावचे म्हसळ्यात नेहमीच योगदान राहिले आहे. अत्यंत खडतर परिश्रम करणारे इथले ग्रामस्थ. याच गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. महादेव यशवंत महाडिक होय. आपल्या कुटुंबासाठी डोंबिवली येथे नोकरी करून गुजराना करणारे महादेव महाडिक यांनी आपल्या मुलीला वकील बनण्यास सांगितले. लेकीने आपल्या पित्याची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत वकिलीची "एल.एल.बी" परिक्षा उत्तीर्ण केली. वाडांबा गावाचे नाव रोशन केल्यामुळे पित्याच्या डोळ्यात आनंदाआश्रू आल्याशिवाय राहिले नाहीत. कुमारी स्नेहल महादेव महाडिक हिने अथक प्रयत्नाने व जिद्दीने एल.एल.बी परिक्षा उत्तीर्ण करून गावाचे,तालुक्याचे आणि सर्वात मोठे परिवाराचे नाव उत्कृष्ट केल्याबद्दल सर्वच स्तरावरून शुभेच्यांचा वर्षाव होऊ लागला आहे. अनेक लोक तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देत आहेत. भविष्यात आपल्या खेडेगावासाठी काम करून
म्हसळा प्रतिनिधी - श्रीकांत बिरवाडकर - देशात व राज्यात थैमान घातलेल्या कोरोनाचे पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊनच्या अटी काही प्रमाणात काही जिल्ह्यात शिथिल करण्यात आल्या असून तसेच रायगड जिल्ह्याचा ऑरेंज झोन मधे समावेश झाल्याने म्हसळा तालुक्यातील विविध सेवा सुरू होणार अशी माहिती नागरिकांमध्ये पसरली आहे. दि.4 मे ला लॉकडाऊन पुन्हा सुरू झाल्याने अनेक नागरिक संभ्रमात आहेत. बाजारपेठ मधील काही दुकाने सुरू होणार आणि कडधान्य, भाजीपाला व मेडिकल सह अन्य सेवा सुविधा सुरू होणार अशी माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना मिळाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले. दि.4 व 5 तारखेला म्हसळा बाजारपेठ मधील कडधान्य, भाजीपाला, मेडिकल सह इतर काही सेवा सुविधांची दुकाने उघडली गेली होती. त्यामुळे 17 मे पर्यत घोषित केलेल्या लॉकडाऊन काळात म्हसळा बाजारपेठ बंद राहणार की सुरू राहणार याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. तसेच स्थानिक म्हसळा नगरपंचायत बाजारपेठ सुरू करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार आहे याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. म्हसळा तालुक्यातील बाजारपेठेत दोन दिवस गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून येत होते, ना
Comments
Post a Comment