प्रविण मोहोकर यांच्या प्रयत्ननाने, रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल ईलाईटचे अध्यक्ष मा. श्री. रितेश मुनोत, मा. श्री. रोट्रॅक्ट भावेश यांच्या मदतीने पनवेल प्रेस क्लबच्या पत्रकारांना केले 'फेस शिल्ड'चे वाटप
पनवेल / जितेंद्र नटे
सद्या सर्वत्र जगभर कोरोना विषाणूचे सावट पसरले आहे. पोलीस, डॉक्टर्स, नर्स यांच्या सोबत पत्रकार ही 'कोरोना योद्धा' म्हणून जबादारी पार पाडत आहेत. मात्र ही जबादारी पार पाडत असताना पत्रकारांच्याही जीवीतास धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल ईलाईटचे अध्यक्ष मा. श्री. रितेश मुनोत, मा. श्री. रोट्रॅक्ट भावेश जैन यांच्या जवळ 'पनवेल प्रेस क्लब'च्या पत्रकारांना 'फेस शिल्ड' देण्याचा प्रस्ताव मल्हार TV चे पत्रकार/निवेदक प्रविण मोहोकर यांनी मांडला. लागलीच रोट्रॅक्ट रितेश मुनोत यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता सृजनशील पत्रकार प्रवीण मोहोकार यांचा हा प्रस्ताव मान्य केला.
आणि आज 'पनवेल प्रेस क्लब'चे आधारस्तंभ संथापक तथा 'दैनिक वादळवारा'चे संपादक - जेष्ठ पत्रकार विजय कडू व अध्यक्ष सय्यद अकबर यांच्या उपस्थितीत सर्व पत्रकारांना 'फेस शिल्ड'चे वाटप करण्यात आले.
अशा प्रकारे पत्रकारांची काळजी घेऊन आम्हाला उपकृत केल्याबद्दल पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री. सय्यद अकबर यांनी 'रोटरी क्लब ऑफ पनवेल' आणि 'रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल ईलाईट'चे अध्यक्ष मा. श्री. रितेश मुनोत, मा. श्री. रोट्रॅक्ट भावेश जैन तसेच पत्रकारासाठी सदैव झटणारे प्रवीण मोहकर यांचे मनापासून आभार मानले. अशाप्रकारे अनेक संस्था, संघटनानी पुढे येऊन पत्रकारांना सहकार्य करावे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment