एक हात मदतीचा* साई संस्थान पुनाडेचे संस्थापक सदानंद पाटील यांच्या माध्यमातून ६० आदिवासी बांधवाना अन्नधान्याचे वाटप




 

 

 

कळंबोली / विकास पाटील

 

 कोरोना विषाणूने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. कोरोना विषाणूवर मात करताना देशासह राज्यात लाँकजाऊन आहे त्यामुळे हाताला काम नसल्याने  पुनाडे ( उरण ) आदिवासी बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे  अपात्कालीन संकट कालात सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाप्रती काही देणं लागते या भावनेतून साई संस्थान पुनाडेचे संस्थापक सदानंद पाटील यांच्या हस्ते महेश्नरी फाऊंडेशन व जीवन गागरे यांच्या सहकार्यातून ६० आदिवासी बांधवाना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

 

 

लॉकडाऊमुळे सर्व व्यवसाय बंद असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या द-याखो-यात व डोंगरमाध्यावर बसलेल्या आदिवासीना बसत आहे. लाँकडाऊनमध्ये गावच्या सीमा बंद केल्याने रानमेवा,  सरपणे विकूणे व मिळेल तिथे काम करून आपले कुटूंब चालविणा-या पुनाडे आदिवासी बांधव कोरानाच्या दहशत परिस्थितीत अगदी हतबल झाला आहे. निराधार महिलाना मुलांचा उदरनिर्वाह कसा होईल हा यक्ष प्रश्न पडला आहे.  या आदिवासी व निराधाराना एकवेळच जीवन मिळणे  मुश्किल होवून उपासमारीची वेळ आली आहे असा  संकट प्रसंगी साई संस्थान पुनाडेचे सदानंद पाटील व प्रकाश पाटील यांनी पुढे येवून मदतीचा हात देत महेश्वरी फाऊंडेशन व जीवन गांगरे यांच्या सहकार्यातून देण्यात आलेले अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप ६० आदिवासी कुटुबाना करण्यात आले. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचा उपक्रम सदानंद पाटील यांनी सुरू केला आहे आता पर्यत त्यांनी पुनाडे , वशेणी , पुनाडे आदिवासी वाडी व दादर ( पेण ) येथील ३५० गोरगरीबाना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप नंदा बाळाजी डाकी , कुंदा जितेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले 

 

यावेळी अनंत पाटील , विमल पाटील, नंदा बाळाजी डाकी, कुंदा जितेंद्र म्हात्रे,  विजय ठाकूर , महानंदा ठाकूर, अपुर्व पाटील ज क पाटील , अशोक पाटील उपस्थित होते . सदानंद पाटील यांचे या गावातून अभिनंदन केले जात आहे.


 

 



 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर