गावी जाण्यासाठी कोण गाडीची व्यवस्था करतोय का? मुंबईकर चाकरमान्याची सार्थ हाक.

कुठे गेले नेते? कुठे गेले सरपंच? कुठे गेले आमदार? कुठे गेले सभा(पती), कुठे गेले पदाधिकारी? 


गावी जाण्यासाठी कोण गाडीची व्यवस्था करतोय का? मुंबईकर चाकरमान्याची सार्थ हाक. 


जगावे कि गावी जावे? हा एकच प्रश्न सद्या कोकण वासियांना सतावत आहे.


म्हसळा / जितेंद्र नटे (रायगड मत)


               मुंबई मधे वसई, विरार, भायंदर, नालासोपारा, बोरिवली, कांदिवली, दादर, वडाळा, डोंबिवली, तसेच नवी मुंबई आणि इतर ठिकाणी अनेक चाकरमानी अडकून पडले आहेत. कुठे गेले नेते मंडळी आणि त्या आपल्या लाडक्या नेत्यालाच निवडून आणा! असे फुगा येईस्तोव बोंबलून सांगणारे त्यांचे लेफ्ट हॅन्ड, राईट हॅन्ड कार्यकर्ते? कुठे गेले भाई? कुठे गेले दादा? कुठे गेले भाऊ? कुठे गेले साहेब? कुठे गेले गावचे पक्षाचे पदाधिकारी? जे नेहमी सांगतात यांना आपण मतदान करू या, आपल्याला गावचा विकास होईल, मंदिराला देणगी मिळेल असे सांगणारे नेत्यांचे लोमडीगिरी करणारे? गेले कुठे? 
             आता खरी गरज आहे गावी जाण्यासाठी गाड्यांची? लोक अडकून पडली आहेत. म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव, रोहा, पोलादपूर, महाड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आपल्या कोकणातील अनेक चाकरमानी अडकून पडले आहेत. बरीच मंडळी ही डायमंड मार्केट मध्ये, खाजगी कारखान्यात काम करीत असतात. आता कोरोना मुळे कारखाने कधी सुरु होतील याची ग्यारंटी नाही. मग खायचे काय? बँकेचे हफ्ते कसे फेडायचे हे प्रश्न तर आहेतच. त्यांना सध्या आर्थिक आणि अन्न धान्य मदतीची गरज आहे. त्यापेक्षा जगायचे कसे हा मोठा प्रश्न पडला आहे? लाखो चाकरमानी आता गावी कसे जाता येईल? याच चिंतेमध्ये आहेत. निदान जीव तरी वाचवता येईल. गावी कसेही मीठ भाकरी खाऊन जगू? अनेक चाकरमानी फोन करुं, व्हाट्सअप द्वारे संदेश करून तुम्ही आवाज उठवा असे आपले मत 'रायगड मत'चे संपादक जितेंद्र नटे यांच्याकडे व्यक्त करीत आहेत. 
             आता आशा आहे ती जसे इलेक्शन आले कि कसे नेते त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे राईट हॅन्ड, मी साहेबांचा खास आहे, मला साहेब डायरेक्ट ओळखतात, नेहमी आपल्या नेत्या सोबत फोटो काढून व्हाट्सअप वर टाकणारे गावचे अति उत्साही पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष, शाखा प्रमुख, वार्ड अध्यक्ष, गेले कुठे? आता करा गाड्या गावी जाण्यासाठी, मिळवून द्या, e-पास आणि आरोग्य सर्टिफिकेट? पण कोणीही कोकणातल्या चाकरमानी साठीधावून येत नाहीत. साधा फोन ही करीत नाहीत आणि जनतेने फोन केला तर यांचा फोन आता स्वीच ऑफ येत आहे. हीच ती वेळ आहे अडचणीत सापडलेल्या आपल्या माणसाला माणुसकी दाखवण्याची. अनेक लोकांकडे पैसा नाही? राशन नाही? आणि वर सरकार सांगतंय बाहेर पडायचं नाही. तर मग करायचे काय? जगावे कि गावी जावे? हा एकच प्रश्न सद्या कोकण वासियांना सतावत आहे. युपी बिहार चे नेते बघा मुख्यमंत्री यांना फोन करुं त्यांच्या माणसांना त्यांच्या खर्चाने घेऊन जातात, राजस्थान, केरळ, गुजरात मधील कित्येक लोक गेली सुद्धा. आमची माणसे मात्र वाऱ्यावर सोडली आहेत. सरकार बाकीच्या लोकांना सर्व फुकट देत आहे. मग एस. टी. का मोफत सोडू नये? फिजिकल डिस्टन्स चे नियम पाळत लोकांना सोडायला काही हरकत नाही. जे बाहेरचे आहेत त्यांची मोठी काळजी आणि आम्ही इथले आहोत 5 ते 6 तासात गावी पोहचू. आम्ही होम क्वरानटाईनसुद्धा होऊ. कोकणी माणूस कधी खोटे बोलणार नाही, प्रसंग कुठला ही असो आमचा चाकरमनी नेहमी सहन करीत आला आहे. कोकण रेल्वे जाते कोकणातुन मात्र त्याचा फायदा बाहेरच्यांना. काय फायदा त्या रेल्वेचा आपल्या स्थानका वर थांबतच नाही. या अश्या अनेक व्याधी मध्ये फसला आहे तो आपला चाकर मनी. मात्र हीच ती वेळ आहे लक्षात ठेवण्याची आणि आपल्या नेत्यांना जाब विचारायची? लक्षात ठेवा थोडे दिवस बोंबल तील मग विसर तील असेच समजतात आपले नेते. 
          हीच ती वेळ आहे त्यांना धडा शिकवीन्याची कुठे गेले आपले पंचायत समितीचे सभापती, जिल्हापरिषद सदस्य, आपले ग्रामपंचायत इलेक्शन आल्यावर गावा गावात भांडगडी करून नोकरीचा खाडा करुंन गावी जाऊन सरपंच पदी ज्याला निवडून दिले तो सरपंच. कुठे आहेत नगरसेवक. करा त्यांना फोन? पण नाही आम्ही इलेक्शन वेळेला पैसे, बाटली घेतो, देणग्या पण घेतो. आणखीन पार्टी पण घेतो. मग कसे विचारणार त्यांना. नुसता गाडीचा खर्च मिळतो म्हणून काही लोक त्यांना मतदान करतात. अरे योग्य उमेदवार, माणुसकी जपणारा नेता निवडला असता तर आज ही वेळ आली नसती. म्हणून नीट विचार करा आपल्या मदतीला आता कोण धावून येतोय तो. आणि लावा फोन आप आपल्या नेत्याला, भाऊंना, सदस्यांना, सरपंचांना... 


पत्रकार जितेंद्र नटे
रायगड मत वर्तमान पत्र 
मुक्काम - सकलप कोंड, 
पोस्ट, तालुका - म्हसळा, 
जिल्हा - रायगड, 
पिन - 402105.
मोबाईल : 
8652654519 
9137595224
Webiste : 
raigadmat.page


(कृपया बातमीमध्ये msg मधे कुणीही छेडछाड करू नये, आपण चाकरमानी असाल आणि तुम्हांला कोकणचा अभिमान असेल, आपल्या नेत्या पर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे असे वाटत असेल तर आणि तुम्ही वरील बातमी शी सहमत असाल तर पुढे पाठवा. जय कोकण !)


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर