टंचाईग्रस्त भागांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी श्रीवर्धन पंचायत समिती सिद्ध
(भारत जाधव)
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत
2020 च्या उन्हाळ्यात पाणी टंचाई ग्रस्त गावांना
पाणी पुरवठा करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. श्रीवर्धन पंचायत समिती कडून मिळालेल्या माहितीनुसार या आराखड्यामध्ये 21 गावे आणि 55 वाड्या अशा एकूण 76 गावांचा पाणी टंचाई निवारणार्थ
आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच 14 गाव आणि 22 वाड्यांसाठी एकूण 36 नवीन विंधण विहिरींची
मागणी केली आहे. त्यासाठी लागणारा अंदाजित खर्च
रु. 57 लाख एवढा प्रस्तावित केलेला आहे.
सद्यस्थितीत श्रीवर्धन पं. स. कडे साक्षीभैरी, वावे तर्फ श्रीवर्धन, आदिवासी वाडी, कोंढे पंचतन, शेखाडी, साखरी, नागलोली मूळगाव, नवी वाडी, मधली वाडी, धनगर
मलई, आदगाव कोळीवाडा, इ. गावे /वाड्यांना टँकरमार्फत
पाणी पुरवठा करणेबाबतचे प्रस्ताव पं. स. कडे प्राप्त झाले
असून दि. 7 मे 20 पासून टँकर अधिग्रहण करण्यात आला आहे. दि. 8 पासून बोर्ली पंचतन ग्राम पंचायत हद्दीतील
वरचे कोंढे पंचतन व दि. 12 मे पासून शेखाडी येथे टँकर-
द्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. तसेच ग्राम पंचायत, हरिहरेश्वर हद्दीतील साक्षीभैरी व ग्रा. पं. वावे तर्फ
श्रीवर्धन हद्दीतील आदिवासीवाडी येथे खासगी विंधण विहीर अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरू करण्यात आला
आहे. श्रीवर्धन पंचायत समिती व पाणीपुरवठा विभाग यांच्या या जय्यत तयारीबद्दल परिसरांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment