जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी १ कोटी ६५ लाख ८९ हजार ८२० रूपयांचे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयास वितरी
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
जिल्ह्यातील श्रीवर्धन व माणगाव, म्हसळा, महाड, कर्जत यासह काही तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडून घरांची पडझड झाली होती. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले होते. त्याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकसान भरपाई मिळावी, याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला होता.
त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी १ कोटी ६५ लाख ८९ हजार ८२० रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य (योजनेत्तर) या लेखाशीर्षाखाली सन २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी शासन, महसूल व वन विभागाकडून कोकण महसूल विभागास रु.१ कोटी ७१ लाख ५८ हजार ८२० अनुदान प्राप्त झाले होते. तद्नंतर विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी या निधीचे वितरण करण्यास मंजूरी दिली असून जिल्हाधिकारी रायगड यांना नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, ०२, पूर चक्रीवादळे इत्यादी, ११३ घरांची दुरुस्ती/पुर्नबांधणी यासाठी सहाय्य (९१) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानांकानुसार खर्च, (९१) (०१) घरांची दुरुस्ती/पुर्नबांधणी यासाठी सहाय्य, ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) (२२४५०३७१) या लेखाशीर्षाखाली सन २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी रु.१ कोटी ६५ लाख ८९ हजार ८२० इतके अनुदान वितरीत केले आहे. लवकरच जिल्हा प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना हि मदत वितरीत करण्यात येणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Comments
Post a Comment