स्व. जनार्दन भगत यांच्या कार्यापासून स्फूर्ति घेऊन ती वर्षभर म्हणजे 365 दिवस जतन करा-- लोकनेते रामशेठ ठाकूर


 


 




पनवेल ( प्रतिनिधी ) थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या जन्म दिनी आणि आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या कार्यापासून स्फूर्ति घेऊन ती वर्षभर म्हणजे 365 दिवस जतन करा असे, आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन  लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आज  (गुरुवार दिनांक ०७ मे  २०२०) येथे केले.


कोरोना विषाणू संसर्गच्या दृष्टिकोनातून सामजिक अंतर नियमांचे पालन करून कष्टकऱ्यांचे  नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची

  ३२ वी पुण्यतिथी झूम ॲपचा वापर करून ऑनलाईन पध्दतीने एकाच वेळी साजरी करण्यात आली. 
    लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे निवासस्थानी स्व. जनार्दन भगत यांच्या प्रतिमेला पुष्पहार  अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर , सभागृह नेते परेश ठाकूर , वर्षाताई ठाकूर ,अर्चना ठाकूर, अमोघ ठाकूर , भाजपचे प्रवक्ते वाय.टी.देशमुख उपस्थित होते तर ऑनलाईन शेलघरहून अध्यक्ष अरुणशेठ भगत,  संजय भगत, सीकेटी नवीन पनवेलहून डॉ.एस.टी. गडदे, इंदुमती घरत, संतोष चव्हाण , उज्वला  कोटीयन , खांदा कॉलनी डॉ. व्ही.डी. बराटे , आर.टी पी.एस. खारघर राज अलोनी , अनीता मिश्रा ,आर.टी.सी.सी.एस. खारघर एस.डी. शहा .के.के.म्हात्रे , बिसिटी लॉं कॉलेज खांदा कॉलनी डॉ. शितला गावंड ,  द्रोणगिरी  श्रीमती अनुराधा काठे  आणि नम्रता न्यूटन या गव्हाण येथून उपस्थित होत्या.

      जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजामध्ये रूजवली. त्यांच्या नावाने व आशिर्वादाने सुरू झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. पण यंदा कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन संस्थेच्या प्रत्येक शाखेत साधेपणाने व फक्त चार जणांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले,  तसेच भगत साहेबांच्या मुळगावी शेलघर येथील निवासस्थानीही सामाजिक अंतर नियमांचे पालन करून फक्त कौटुंबिक आदरांजली वाहण्यात आली.

    यावेळी संस्थेचे अध्यक्ष लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले की, स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची जयंती  यावर्षी आपण  मोठ्या उत्साहात साजरी केली. त्यांच्या कार्याचे स्मरण कायम रहावे, यासाठी थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना स्व. भगत साहेबांच्या नावाने पुरस्कार देऊन राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते  डॉ. अनिल पाटील यांचे अध्यक्षतेखाली  गौरवण्यात आले. यावेळी पालकमंत्री  आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेश बालदी उपस्थित होते.  पण त्यांची पुण्यतिथी मात्र कोरोंनामुळे अत्यंत साधेपणाने कमीत कमी उपस्थितीत साजरी करीत आहोत
         
  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य अखंडपणे सुरू आहे. संस्थेच्या शाखांमध्ये दरवर्षी होणारी वाढ हे त्याचे निर्देशक आहे. संस्थेने लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आज आपल्याला पहायाला मिळत आहे.सन 2018  मध्ये शासनाने सिकेटी महाविद्यालयाला स्वायत्त विद्यापीठ म्हणून मान्यता दिली.  राष्ट्रीय स्तरावरील 'एज्युकेशन वर्ल्ड' या मासिकाने एप्रिल २०२० च्या विशेषांकामध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील भारतातील खाजगी स्वायत्त महाविद्यालयां मध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या महाविद्यालयांच्या यादीमध्ये पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर स्वायत्त कॉलेज या महाविद्यालयाचा समावेश केला आहे. त्यामुळे संस्थेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला. सी. के. टी. कॉलेजला राष्ट्रीय स्तरावरील ६९ वे आणि राज्यस्तरावरील २१ वे क्रमांकाचे रँकींग दिले आहे. अत्यंत अल्पावधीमध्ये चांगू काना ठाकूर कॉलेजने खूप मोठे यश प्राप्त केले आहे. संस्थेच्या माध्यमातून यापुढे ही आपण विविध शैक्षणिक उपक्रम राबवणार आहोत. आता नीट आणि जेईईचे ही प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शाखांच्या सर्व प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे त्यांनी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे सूत्रसंचालन प्राध्यापक शैलेश वाजेकर ह्यांनी केले    

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर