नवी मुंबई सिडको अध्यक्षपदासाठी उरण राष्ट्रवादीची आगेकूच प्रशांत पाटील यांच्या नावासाठी कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी
पनवेल : राज भंडारी
आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई जिल्हानिरिक्षक प्रशांत पाटील यांची सिडको अध्यक्ष पदी निवड केली जावी अशी मागणी उरण तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार, उरण विधानसभा अध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर आणि उरण तालुका अध्यक्ष मनोज भगत यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
प्रशांत पाटील यांनी बेलापुर आणी ऐरोली दोन्ही मतदार संघात जिवाची पराकाष्ठा करुन, जसे जणू तेच निवडणुकीसाठी ऊभे आहेत म्हणून नवी मुंबई मधे दोन्ही मतदार संघात कुठलाही आधार नसताना, कार्यकर्त्यांची फळी तुटलेली असतानाही, सर्वाना एकत्र करुन आधार देऊन, एका कुटुंबाप्रमाणे देखभाल केली आहे. खुप कमी वेळात नवी मुंबईत उरण, पनवेलचे कार्यकर्ते आणी आपल्या भुमिपुत्राची मने जिंकून त्यांनी काम केले. पक्षाला निसटता पराभव जरी भेटला पण कमी वेळात सर्व कार्यकर्त्याची एकमुठ बांधून पक्ष बळकट करण्याचे काम प्रशांत पाटील यांनी केले आहे.
प्रशांत पाटील यांनी बेलापुर आणी ऐरोली दोन्ही मतदार संघात जिवाची पराकाष्ठा करुन, जसे जणू तेच निवडणुकीसाठी ऊभे आहेत म्हणून नवी मुंबई मधे दोन्ही मतदार संघात कुठलाही आधार नसताना, कार्यकर्त्यांची फळी तुटलेली असतानाही, सर्वाना एकत्र करुन आधार देऊन, एका कुटुंबाप्रमाणे देखभाल केली आहे. खुप कमी वेळात नवी मुंबईत उरण, पनवेलचे कार्यकर्ते आणी आपल्या भुमिपुत्राची मने जिंकून त्यांनी काम केले. पक्षाला निसटता पराभव जरी भेटला पण कमी वेळात सर्व कार्यकर्त्याची एकमुठ बांधून पक्ष बळकट करण्याचे काम प्रशांत पाटील यांनी केले आहे.
असा नेता पुन्हा भेटणे नाही म्हणून पक्षाने प्रशांत पाटील यांना सिडको अध्यक्ष पदावर विराजमान करुन, स्थानिक भुमिपुत्रांना न्याय देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अस मत राष्ट्रवादीचे रायगड़ जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार, उरण विधानसभा अध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर आणि उरण तालुका अध्यक्ष मनोज भगत यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पंवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी पुखराज सुथार यांनी बोलताना सांगितले की, प्रशांत पाटील यांना संधी दिल्यास नवी मुंबई, उरण, पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील कार्यकर्त्यांना अधिकच बळ मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली..
कोण आहेत प्रशांत पाटील
मूळचे उरण येथील असणारे प्रशांत पाटील आगोदर शिवसेना रायगड जिल्ह्याचे प्रमुख होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे, पुढे जाऊन गणेश नाईकांनी जेव्हा शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादीची वाट धरली त्याच काळात प्रशांत पाटील यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यानंतर उरण JNPT परिसरात त्यांनी स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलं. आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवारांच्या विश्वासातील निवडक व्यक्तींपैकी प्रशांत पाटील हे एक शिलेदार मानले जातात. खरं तर प्रशांत पाटील यांची ओळख नवी मुंबईला खऱ्या अर्थाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली जेव्हा गणेश नाईकांनी पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. अशा वेळी नवी मुंबईत राष्ट्रवादीची पकड सुटत चालली असताना पवारांनी प्रशांत पाटील यांच्यावर नवी मुंबई जिल्ह्याच्या निरीक्षक पदाची जबादारी सोपवली आणि त्यानंतर त्यांनी मा. महापौर आणि विद्यमान नगरसेवक अशोक गावडे यांची नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी निवड करत संघटनात्मक बांधणी करून पवारांनी दाखवलेला विश्वास प्रशांत पाटील यांनी मा. मंत्री आणि माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदेंच्या मदतीने सार्थ करून दाखवत ऐरोली आणि बेलापूर मतदार संघात जवळपास 80 हजाराच्या जवळपास मतदान राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मिळविलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान प्रशांत पाटील यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्लाचढवून राष्ट्रवादी
Comments
Post a Comment