रुग्ण सापडलेल्या सोसायटी प्रशासनाने त्वरित सील कराव्यात, असे पत्र खांदा कॉलोनी वार्ड क्र. 15 चे नगरसेवक तथा प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी केली आहे.
कोरोनाबाधीत कुटुंबियांच्या चाचण्या फास्ट ट्रॅकवर करण्यात याव्यात त्याकरता विलंब होऊ नये. येणारा खर्च महापालिकेने उचलावा असाही आग्रह प्रभाग समिती सभापतींनी धरला आहे.
पनवेल / जितेंद्र नटे
raigadmat.page
खांदा कॉलोनी येथे अनेक सोसायटी मध्ये कुटुंबीतील सदस्यांना संसर्ग होत असल्याचे आढळून येत आहे. दरम्यान संबंधितांना त्वरित क्वारंन्टाइन करावे आणि त्यांची मोफत कोविड 19 तपासणी करण्यात यावी अशी वार्ड क्रमांक 15 चे सक्रिय नगरसेवक तथा प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी पनवेल महापालिकेकडे केली आहे. रुग्ण सापडलेल्या इमारती त्वरित सील करण्या यावा ज्या सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तसेच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या इमारती त्वरित सिल करण्याची गरज आहे. अनेकदा त्यासाठी उशीर होतो ही वस्तुस्थिती आहे. काही तांत्रिक अडचणी मुळे विलंब होतही असेल मात्र त्यामुळे कोरोना विषाणूंचे संक्रमण होण्याची दाट शक्यता असते. प्रशासनाने त्वरित या इमारती सील कराव्यात अशी, मागणी प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष व खांदा कॉलोनी वार्ड क्रमांक 15 चे नगरसेवक संजय भोपी यांनी केली आहे.
23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम राहिलेले नाही. रोजगार बंद असल्याने हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कोरोनाचे रुग्ण असलेल्या कुटुंबातील प्रमुख असल्याने मानसिक स्थिती बिघडलेली असते. पूर्ण कुटुंब भयभीत झालेले असते. त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. संकट ओढवलेले असताना त्यांना स्वखर्चाने कोविड 19 चाचणी करायला लावू नये, अशी मागणी भोपी यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांजकडे केली आहे.
Covid 19 कोरोना संबंधितांना या चाचणी करीता येणारा खर्च परवडणारा नाही. किंवा अनेकांकडे तितके पैसे असतातच असे नाही. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी असा मुद्दा संजय भोपी यांनी उपस्थित केला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विशेष करून मुंबई अत्यावश्यक सेवा देण्याकरीता जाणार्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. दरम्यान कोविड 19 पॉझिटिव्ह येणार्या रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कात त्यांचे कुटुंबीय येतात. या सर्वांना त्वरित क्वारंन्टाइन करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते लॅबमध्ये पाठवणे गरजेचे आहे. दरम्यान संबंधितांना स्वतः चाचणी करून घेण्याचे सांगितले जाते. Corona - Covid - 19 ची चाचणी खर्चिक आहे. त्यामुळे कोरोनाबाधित अशा रुग्णांच्या कुटुंबीयांना हा खर्च परवडणारा नाही. कित्येकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. एकाच कुटुंबातील चार ते पाच सदस्यांची चाचणी करण्यासाठी 30 ते 35 हजार रुपये ते आणणार कुठून? असा मुद्दा भोपी यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोरोनाबाधीत कुटुंबियांच्या चाचण्या फास्ट ट्रॅकवर करण्यात याव्यात त्याकरता विलंब होऊ नये. येणारा खर्च महापालिकेने उचलावा असाही आग्रह प्रभाग समिती सभापतींनी धरला आहे.
raigadmat.page
वरील लिंक नियमित ओपन करा आणि आपल्या विभागातील बातम्या वाचा. - जितेंद्र नटे (संपादक रायगड मत)
Comments
Post a Comment