'रायगड मत'च्या बातमीचा दणका, घेतली प्रशासनाने दखल - संजय तटकरे आम्ही कलेक्टर पर्यंत केले होते पत्र व्यवहार, प्रशासनाने दिले 14 दिवसच होम क्वारनटाइन राहण्याचे आदेश.
म्हसळा / श्रीवर्धन @ रायगड मत
गेली अनेक दिवस प्रशासन आणि मुबंई वरून वैतागून आलेले चाकरमानी यांच्यात 14 कि 28 दिवस लोकडाऊन वरून संघर्ष चालू होता. अनेक समाज सेवक, पत्रकार बांधव तसेच अनेक चाकरमानी हा कालावधी 14 दिवसांचा व्हावा म्हणून प्रयत्न करीत होते. मात्र रेड झोन मधून जे आले आहेत अश्याना 28 दिवस होम क्वारनटाइन राहावे लागेल असे आदेश स्वतःच निर्णय घेऊन तहसील प्रशासन देत होते. यामुळे नागरिक हैराण झाले होते. राज्य शासनाचा आदेश 14 दिवसाचा असताना हे असे कसे करतात? हा एकच प्रश्न लोकांना सतावत होता. आम्ही म्हसळा, श्रीवर्धन मधून अनेक लेटर ही ई-मेल केले. मात्र शेवटी कलेक्टर पर्यंत हा विषय पोहचला तो फक्त 'रायगड मत' चे संपादक जितेंद्र नटे यांच्या दणदणीत बातमीमुळे. काल रायगड मत ने हा प्रश्न हातात घेऊन तहसीलदार तसेच कलेक्टर पर्यंत चर्चा केली आणि लोकांची समस्या काय आहे? त्यांना अन्न धान्य मिळण्यापासून ते जेवण मिळेपर्यंत अनेक समस्या काय आहेत? याचे विश्लेषणच बातमीच्या माध्यमातून मांडले. त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आणि 28 दिवस नसून 14 दिवसच होम क्वारनटाइन नियम आहे असे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा 26 मेला पत्र पाठवले. त्यामुळे आधीच मुबंईत 2 महिने वैतागलेल्या मुंबईकराना आता दिलासा मिळाला आहे. यापुढे 14 दिवसांनी आपल्याला बाहेर पडता येईल म्हणून खूष झालेल्या अनेकांनी आम्हाला, तसेच रायगड मत चे संपादक जितेंद्र नटे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या व आभार मानले.
Comments
Post a Comment