1 मे 'रायगड मत'चा 12 वा वर्धापन दिन. 2009 ते 2020 - संघर्षाची 12 वर्षे
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यासारख्या दुर्गम भागातून एका सकलप कोंड या खेडेगावातून सुरु केलेले हे वर्तमानपत्र म्हणजे श्रीवर्धन मतदार संघाचा आणि रायगडच्या तमाम जनतेचे 'लोकमत' बनले आहे. अशा खेडेगावातून सुरुवात जिथे ना व्यवस्था आहे, ना रस्ते, ना धड वीज, ना रोजागार, ना कुठलेले आर्थिक स्तोत्र कमावण्याचे साधन? आजही इथल्या लोकांना पोटापाण्यासाठी मुंबईवरच अवलंबून राहावे लागते.
आपल्या खेडेगावातील, तालुक्यातील तसेच दक्षिण रायगडच्या जनतेच्या समस्या प्रखरपणे मांडण्यासाठी 'रायगड मत'चा संपादक म्हणून मी जितेंद्र नटे गेली 12 वर्षे जिकरीचे प्रयत्न करीत आहे.
2009 साली इंटरनेट, सोयीसुविधा एवढ्या नव्हत्या. एवढेच काय न्यूजपेपर वर्तमानपत्रेही नव्हते. तसेच मोठ्या पेपरमध्ये खेडेगावातील बातम्या लागत नसत. कुणीही लक्ष देत नसे. अशा वेळी स्थानिकांचे प्रश्न सुटणार कसे? नवाकाळ, संध्याकाळ, इनमुंबईनगर, मुंबई लक्षदिप, सॅप मीडिया वर्ल्डवाईड, अद्वैत फीचर (न्यूज एंजसी), सॅफ्रान मीडिया अशा नामांकीत कंपनीत नोकरी मी केली होती. 2009 साली एशीयन फोटोग्राफी या मॅगझीन मध्ये काम करीत असतांना आपल्याकडील जनतेच्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असावे असे मला वाटू लागले.
यातूनच 'रायगड मत'चा 2009 साली जन्म झाला. व्यवसाय म्हणून नव्हे तर समाजसेवा म्हणून 'रायगड मत' हे वर्तमान पत्र सुरु केेले. मीडियामध्येच नोकरीची सुरुवात आणि गेली 20 वर्षे मीडियामध्येच काम करीत करीत कसा बसा पेपर चालवला आहे. प्रीटिंगचा खर्च परवडत नसतांना आणि डिस्ट्रीब्यूशन परवडत नसतांना अनेक सभासद बनवीले. मात्र खेडेगावातील जनतेकडे पैसा नाही, ते खर्च करीत नाहीत. तसेच जाहिरातही कुठे मिळत नाही. म्हणून हा खर्च स्वत:च्या पगारातूनच करू लागलो.
असे करीत करीत 12 वर्षे हा रणगाडा हाकला गेला. तोपर्यंत आता बराच बदल झाला आहे. आता अनेक पर्याय ऑनलाईन न्यूजपोर्टल, युट्युब चॅनेल तसेच मोठ्या पेपरच्या पण स्वतंत्र जिल्हा पुरवण्या असतात. त्यामुळे तालुक्यातील बातम्या लोकांना वाचायला मिळतात. 20 वर्षापूवी काही हाताच्या बोटावर मोजता येतील म्हणजे 1 ते 2 पत्रकार होते. आता भुरट्या पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच आता सोशल मीडियाचा तमाशा सुरू झाला आहे. त्यामुळे लोकांना व्हाटसअपवर बरीच माहिती मिळू लागली आहे. सध्या म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि माणगावमध्ये चालू असणारे भारत सरकार मान्यताप्राप्त आर.एन.आय. रजिस्टर असणारे 'रायगड मत'हे एकमेव वर्तमान पत्र जिवंत आहे. त्यावेळी मुंबईकरांना माहिती मिळत नव्हती मात्र आता बरीच माहिती ताबडतोब मिळते आहे. सोशल मीडिया प्रभावी झाली आहे. अशामध्ये सुध्दा 'रायगड मत' मागे राहिला नाही. "कालाय तस्माय नम:" म्हणत वेबसाईट काढली. जवळ जवळ 5 लाख लोकांनी 'रायगड मत'च्या वेबसाईटला भेट दिली आहे. प्रचंड वेगाने 'रायगड मत' पसरत आहे. आता न्यूज चॅनेलही काढले आहे.
कशी झाली सुरुवात
नवाकाळ - संध्याकाळ वर्तमान पत्राच्या संपादीका रोहिणीताई खाडीलकर यांनीच 'रायगड मत'चे 1 मे 2009 साली प्रकाशन केले होते. त्यांच्या हाताखाली नोकरी केल्याचा चांगला अनुभव मिळाला. न्यूजपेपर कसा चालवायचा, बातम्या कशा असल्या पाहिजेत, शोधक पत्रकारीता तसेच सामान्य लोकांचे प्रश्न कसे सोडवावे? प्रशासनाशी कसे संपर्क करायचे? हे त्यांच्याकडून चांगले शिकायला मिळाले.
त्यांच्या अगोदर अद्वेत फिचर न्यूज एजन्सी मध्ये हर्षल प्रधान सर यांच्या हाताखाली मीडियातील बरीच कामे शिकलो. ते ज्येष्ठ पत्रकार तसेच मीडिया किंग आहेत. सध्या ते मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे खाजगी मीडिया पी.ए. म्हणून सेवेत आहेत. त्यांच्याकडे 3 वर्षे काम केल्याचा मोठा अनुभव मिळाला. यंदा पुरस्कार सोहळा ठेवायचा होता आणि थेट सरांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांना श्रीवर्धन येथे आणायचे प्रयत्न होते. मात्र कोरोना सावटामुळे ते थांबवावे लागले. मात्र आता हा सोहळा दिवाळीमध्ये 'रायगड मत' सन्मान पुरस्कार सोहळा म्हणून होईल. उध्दव साहेबांचे श्रीवर्धनवर विशेष प्रेम आहे आणि यानिमित्ताने ते येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. मात्र आता थांबूया आणि वाट पाहूया.
12 वर्षे 1 तपाची आणि
चांगल्या वाईट अनुभवाची
जेवढा संघर्ष मोठा,
तेवढा समाधान मोठा.
हे 12 वर्षे इतकी सहजासहजी सोपे गेलेले नाहीत. आर्थिकच्या अडचणींचा सामना करीत असतांना अनेक चांगल्या वाईट अनुभवांनाही सामारो जावे लागले आहे. आपणास ठाऊक आहेच. पत्रकार म्हणजे "बिन पगारी, फुल अधिकारी" लोकांना समस्या सोडविण्यासाठी पत्रकार हवा असतो. पण प्रसंग पडल्यावर कोणीही सोबत येत नाही. अनेक समाज कंटक तसेच राजकारणी लोकांची दुष्मनी ओढवून घ्यावी लागते. अनेक विरोधात्मक बातम्या गेल्या की विरोधक वाढत जातात. कधी कधी तर बदनामीही झेलावी लागते. त्रास दिला जातो. मदत कोण करीत नाही. मात्र त्रास भयंकर दिला जातो. पण हे सगळं सहन करावे लागते. जेवढा संघर्ष मोठा, तेवढा समाधान मोठा. अनेक वर्षे या क्षेत्रात काम करीत असतांना पैसा नाही कमवु शकलो पण लोकांच्या समस्या सोडवून समाधान मात्र कमावले. 12 वर्षे हा रणगाडा चालू राहिला पुढे राहिल की नाही हे माहित नाही. काही लोकांना रोजगार ही निर्माण करू शकलो. अनेक पत्रकार, जाहिरातदार, तसेच समाजसेवक 'रायगड मत'ने घडवले आहेत. काही लोकांना यातून आर्थिकची मदतही झाली. अनेक सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम करून अनेक लोकांना पुढे आणण्याचा प्रयत्न 'रायगड मत'ने सतत केले आहे. घरच्या लोकांची साथ मोलाची असते. पण हे क्षेत्र असे आहे जिथे पैसा कमी आणि त्रासच जास्त असतो. कधी कधी आपल्यामुळे कुटुंबालाही त्रास सहन करावा लागतो. आजकाल सगळे राजकारणात जायला सांगतात. कारण तेथे पैसा आहे, समाजसेवा करायला कुणाला आवडत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मीडिया आहे म्हणून राजकारणी आणि प्रशासनावर वचक राहिले आहे, अन्यथा काही लोक देशाची, समाजाची तसेच अनेक ठिकाणी व्यवस्थेची वाट लावून टाकतील.
सध्या वर्तमान पत्राचा व्यवसाय फार जोखमीचे झाले आहे. जेवढा खर्च आहे तेवढा नफा नाही. तोट्यातला धंदा आहे. तरीही जनतेच्या आशिर्वादाने जेवढे झेपेल तेवढे प्रयत्न जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी करायचे आहेत. सर्व हितचिंतक, सभासद, जाहिरातदार तसेच वाचक मंडळींचे 'रायगड मत'ला साथ दिल्याबद्दल जाहिर आभार. अशीच साथ लाभो! सद्या कोरोना महामारीचे सावट आहे. कोरोना संदर्भात तील बातम्या 'रायगड मत' आपल्यापर्यंत raigadmat.page या वेबसाईटच्या माध्यमातून पोहचवीत आहे. हे देशासाठी लढत असलेले युद्धच आहे, आपण या सर्वांचा सामना करू या, सरकारला साथ देऊ या, घरीच राहून कोरोनाला हरवू या. जितना बढा संघर्ष, उतनी बढी जीत
धन्यवाद - जितेंद्र नटे (संपादक : रायगड मत) 8652654519 / 9137595224 raigdmat.page
Comments
Post a Comment